स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय ( सुपर स्पेशलिटी) हॉस्पिटल अमरावती. येथे 78 वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली.सदर रुग्ण हा काही महिन्यांपासून किडनी आजाराने त्रस्त होता. त्यासाठी बाहेर उपचार पद्धती चालू होती.तेव्हा डॉक्टरांनी रुग्णास व त्याच्या कुटुंबियांस किडनी प्रत्यारोपनविषयी माहिती दिली व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय ,अमरावती येथे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या यशस्वी व विनामूल्य शस्त्रक्रिया यासाठी रुग्ण विविध जिल्ह्यांमधून नव्हे तर इतर राज्यामधून सुद्धा येत असतात याविषयी महिती दिली. तेव्हा आज रुग्णालयात झालेले 78 वे किडनी प्रत्यारोपण, हे 27 वर्षीय रोशन सदाफ शहजाद अहमद यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. सदर रुग्ण ही रा. बडनेरा जि. अमरावती येथील रहिवासी असून मागील ४ महिन्यांपासून डायलिसिस चालु होते. मात्र डायलिसिस यावर दीर्घकाळ उपाय नसून व होणारा त्रास बघुन किडनी प्रत्यारोपण हा यावरील योग्य उपाय आहे, असे जेव्हा डॉक्टरांनी सांगितले त्यावेळी आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करून वडील काजी रहमुद्दीन कैमुद्दीन काजी (वय 55 वर्षे ) यांनी आपली एक किडनी मुलगि रोशन सदाफ शहजाद अहमद ला देण्याचा निर्णय घेतला, व आपली एक किडनी मुलीला देऊन तिला नवीन जीवन दिले. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत शस्त्रक्रिया विनामुल्य करण्यात आली.
सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अमरावती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफरोलॉजिस्ट डॉ. अविनाश चौधरी, युरो सर्जन डॉ.राहुल पोटोडे, डॉ.विक्रम देशमुख, डॉ. प्रतिक चिरडे ,डॉ राहुल घुले , बधिरिकरण तज्ञ- डॉ. रोहित हातगावकर, डॉ.बाळकृष्ण बागवाले, दिपाली देशमुख,डॉ शीतल सोळंकी, डॉ.विक्रांत कुळमेथे, डॉ.माधव ढोपरे,डॉ. जयश्री पुसदेकर, डॉ.नाहीद, डॉ. रमणीय,डॉ. उज्वल अभ्यंकर, डॉ. प्रियंका कांबळे, डॉ. श्रद्धा जाधव,समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) शितल बोंडे, ऋषिकेश धस, डॉ.सोनाली चौधरी,महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने मधील एम.सी.ओ.डॉ. पायल रोकडे ,डॉ. दिव्यांनी मुंदाने, कल्याणी गाढवे त्याचप्रमाणे अधीसेविका चंदा खोडके व मालती प्रधान यांच्या सूचनेनुसार इन्चार्ज सिस्टर ज्योती तायडे, सरला राऊत, वैष्णवी निकम, माधुरी सोनटक्के, दीपाली तायवाडे, अक्षय पवार,कीर्ती तायडे, यशोधरा नेवाडे , मयुरी खेरडे, ओम महल्ले, निलिमा मळवार,अनु वडे,योगिश्री पडोळे,वैशाली ढोबळे, कोमल भालेकर, रुपाली गवई , दीक्षा बेलखेडे, अर्चना मढावी ,वैष्णवी टाकरखेडे,आहारतज्ञ कविता देशमुख, रश्मिता दिघडे, श्रीधर ढेंगे, औषध विभागामधील योगेश वाडेकर, अमोल वाडेकर, प्रशांत शिरे, शुभम वरघडे , पंकज बेलुरकर , सुनीता ठाकूर ,अविनाश राठोड,गजानन मातकर, रूपेश हरडे,आशिष थुल, आशिष मिश्रा,राहुल चव्हाण,रंजना दिपटे, मंगला भेंडकर, इंदू पाटील, गजानन चौधरी,प्रशांत थेटे, निलेश आत्राम, इत्यादींचे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये विषेश सहकार्य होते.