महाराष्ट्र मंदिर महासंघाची दुष्काळीग्रस्त परिस्थितीत साहाय्य करण्याची मागणी!
अमरावती / उत्तम ब्राम्हणवाडे
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने २८ ऑक्टोबर या दिवशी अमरावती येथील श्री नागेश्वर मंदिर सभागृह, कोल्हटकर कॉलनी, गणेश कॉलनी, शिलांगण रोड येथे मंदिर विश्वस्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड समन्वयक तथा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले उपस्थित विश्वस्तांना संबोधित करतांना म्हणाले की,
”काहीही झाले, तरी आपण शांत राहतो; त्यामुळे आपल्याला गृहीत धरले जाते. त्यासाठी मंदिरांचे संघटन, समस्या आणि संस्कृती रक्षणासाठी मंदिर विश्वस्तांची प्रभावी इकोसिस्टीम असणे आवश्यक आहे. एका मंदिरावर अडचण आली, तर अनेक मंदिरांचे विश्वस्त त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजेत. त्यामुळे विश्वस्तांनी याचकाची भूमिका सोडून ठोस भूमिका घेतली पाहिजे. कोणाचीही मंदिरांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होता कामा नये.

मेळाव्यात १२५ मंदिरांचे विश्वस्त उपस्थिती
अमरावती जिल्ह्यात मंदिरांना जोडण्यासाठी आता ‘मंदिर जोडो अभियान’ प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र मंदिर महासंघाशी अनेक लढवय्ये अधिवक्ते जोडलेले आहेत. मंदिरांच्या विविध समस्यांवर यशस्वी तोडगा काढण्यासाठी महासंघ राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. मंदिरांच्या समस्या सोडवणे आणि मंदिर संस्कृतीचे रक्षण करणे यांसाठी ‘मंदिर जोडो अभियाना’च्या माध्यमातून मंदिरांचे प्रभावी संघटन उभारण्यासाठी सर्व मंदिर विश्वस्तांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन श्री. सुनील घनवट यांनी केले.
देवस्थान जमिनी सुरक्षित करण्याकरिता सक्षम कायदा येणे गरजेचे – श्री. अनुप जयस्वाल
देवस्थान जमिनी सुरक्षित करण्याकरिता सक्षम कायदा येणे गरजेचे असल्याने महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रतिनिधी कार्य करीत आहे. तीर्थक्षेत्र विकास निधी बाबतच्या अडचणीवर शासनाने तोडगा काढणे आवश्यक आहे.

शेतमालाचे नुकसान झाले आहे तर त्यामध्ये नुकसान भरपाई देताना भेदभाव नको:श्री. श्रीकांत पिसोळकर
श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले आज मंदिरावर होणाऱ्या आघातांविषयी मंदिरांचे संघटन होणे आवश्यक आहे. शेतमालाचे नुकसान झाले आहे तर त्यामध्ये नुकसान भरपाई देताना भेदभाव कशाला ती शेती मंदिराची असो का शेतकऱ्याची असो यासाठी यासाठी नुकसान भरपाई दिली पाहिजे यासाठी मंदिरांनी संघटित होऊन शासनाकडे आपली भूमिका मांडण्याची गरज आहे.
देवस्थान इनामधारक शेतकरी और देवस्थानांना दुष्काळी साहाय्य द्या! विश्वस्त मेळाव्यात शासनाकडे मागणी
शासनाच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हानीभरपाई आणि साहाय्य देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही स्तुत्य गोष्ट असली, तरी देवस्थान इनाम सनदधारक (वहिवाटदार) म्हणून शेती करणाऱ्या अधिकृत शेतकऱ्यांना तसेच राज्यातील देवस्थानांना या साहाय्य प्रक्रियेपासून वंचित ठेवले जात असल्याचा प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला. इतर शेतकऱ्यांप्रमाणे देवस्थानांनाही आर्थिक साहाय्य देण्यात यावे. अशी मागणी विश्वस्त मेळाव्यात करण्यात आली.या मेळाव्याला हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कोअर कमिटीचे सदस्य श्री. अनुप जयस्वाल, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रदीप गर्गे, श्री. सचिन वैद्य तसेच राधाकृष्ण मंदीरचे विश्वस्त व अधिवक्ता श्री. अभिजीत बजाज यांची उपस्थिती होती. श्री सावंगा विठोबा अवधूत संस्थांचे अध्यक्ष पुंजारामजी नेमाडे, सचिव अशोक सोनवाल, माता खिडकी संस्थानचे अध्यक्ष सुभाष पावडे, अंबादेवी संस्थानचे ॲड राजेंद्र पांडे, पिंगळादेवी संस्थानचे अध्यक्ष विनीत पाखोडे, कोंडेश्वर संस्थानचे रामकृष्ण लांडोरे, लक्ष्मीनारायण संस्थान अचलपूरचे अशोक खंडेलवाल , श्री रेणुकामाता संस्थानचे श्री.उत्तम ब्राम्हणवाडे आदी मंदिरांचे विश्वस्त या मेळाव्याला उपस्थित होते.
