कार्यक्रमाच्या अध्यक्षपदीअमरावतीच्या डॉ मनीष गवई यांची निवड
२३पासून लेह-लडाखमध्ये होणार मराठी विश्व साहित्य संमेलनाला सुरुवात,
देशभरातील साहित्यिकांचा सहभाग
अमरावती ( जिल्हा प्रतिनिधी)
मराठी साहित्याचा वैश्विक जागर घडविणाऱ्या शब्द मराठी विश्व साहित्यसंमेलनाचे अकरावे पर्व लेह-लडाख येथे २४ ते २९ ऑगस्ट दरम्यान रंगणार आहे. मराठीभाषेचा जगभर प्रचार आणि प्रसार व्हावा,
याउद्देशाने शब्द परिवाराच्या वतीने सातत्याने विविध देशांत साहित्य संमेलने आयोजितकेली जात आहेत. संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अमरावतीचे सुपुत्रतथा भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याणविभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थीतथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावतीविद्यापीठाच्या राज्यपाल माजी नामित सिनेट सदस्य, खाजगी सचिवव हिंदुस्थान स्काऊट अँड गाईडचे निवासी आयुक्त डॉ. मनिष शोभा शंकरराव गवई यांची निवड करण्यात आलीअसून त्यांच्या या निवडीमुळे अमरावतीच्या साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरणनिर्माण झाले आहे.

यापूर्वी थायलंड, दुबई, इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका,मालदीव, नेपाळ, मॉरिशस,सिंगापूर आणि भूतान येथे शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन यशस्वीपणेपार पडली आहेत.याविश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरच्या ज्येष्ठ लेखिका अरुणा सबाने,उद्घाटक म्हणून पुण्याच्या संगीता धायगुडे, तरसभारंभाच्या अध्यक्षपदी अमरावतीचे सुपुत्र डॉ मनीष गवई यांची उपस्थिती राहणार आहे.देशभरातील साहित्यिक, कवी, लेखक,प्रबोधनकार आणि साहित्यप्रेमी या संमेलनात सहभागी होणार आहेत.विशेषम्हणजे, अमरावतीचे सुपूत्र असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरतीयुवक कल्याण क्षेत्रातील भरीव कामगीरी करणारे व आंतरराष्ट्रीय सार्क संघटन्नेचेदुत असलेले डॉ. मनीष शोभा शंकरराव गवईयांचे सामाजिक, शैक्षणिक, साहित्यक्षेत्रात उल्लेखन्निय कामगीरी केलेलीआहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कृत करण्यात आलेले असून मराठीसाहित्य क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले आहे.डॉ गवई यांनी देखीलविविध साहित्याचे लेखन केले असून त्यांचा काहूर कवितासंग्रह फार प्रसिद्ध झाला आहेयासोबतच त्यांनी ३०० पेक्षा जास्त पात्र पत्रिकांमध्ये लेखन केले आहे.विशेष करूनकॉलजे कट्टा, शैक्षणिक परिसरातून यात्यांच्या शैक्षणीक क्षेत्रातील लेखमाला गाजल्या आहे.अमरावतीचे अभिमान, एक ध्येय एवढ्या कुलगुरू डॉ दिलीप मालखेडे, डॉबाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यातील शैक्षणिक मूल्य, संघर्षयोद्धा रामदास आठवले, माझी चिन यात्रा, वर्ल्ड हिरो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आंतरराष्ट्रीययुवा नेतृत्व, सफल जीवनाचे रहस्य, आपत्तीव्यवस्थापन तंत्र आणि मंत्र, माझा जीवन संघर्ष -एक प्रवास,भारताचे संविधान कर्तव्य आणि जबाबदाऱ्या इत्यादी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. अमरावतीच्यासाहित्य क्षेत्रासाठी डॉ मनीष गवई हे नाव नवखे नसून गेल्या अनेक वर्षांपासूनसाहित्याची सेवा करण्याचे काम देखील त्यांनी केले आहे अमरावतीच्या साहित्यचळवळीमध्ये देखील त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे मराठी साहित्याच्या विकासाच्या चळवळीमध्येत्यांनी आपली योगदान दिले असून अमरावतीमध्ये मराठी साहित्य क्षेत्रातील कार्यक्रमांचेआयोजनामध्ये त्यांची देखील भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे अमरावतीच्या सुपुत्राचीअशा प्रकारच्या जागतिक स्तरावरील साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी निवड होणे ही अमरावतीसाठी अभिमानाची बाब असून त्यामुळे अमरावतीच्यासाहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे डॉ गवई हे अनेक विद्यापीठांच्या प्राधिकरणावरअसून मराठी साहित्याला चालना देण्यासाठीते विद्यापीठ स्तरावरून देखील प्रयत्न करीत आहे दिल्लीमध्ये राहून दिल्लीतमराठीच्या अस्मितेचा जागर करण्याचे कार्य ते सातत्याने करीत आहे.शब्दचेप्रमुख संजय सिंगलवार आणि उपाध्यक्ष शशी डंबारे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्याअकरा वर्षांपासून हे साहित्य संमेलन सातत्याने आयोजित केले जात आहे. विशेष म्हणजे,शासनाकडून कोणतेही अनुदान न घेता सहभागी साहित्यिकांच्या सहकार्यानेविविध देशांत मराठी साहित्याचा आणि माय मराठीचा जागर घडवून आणला जात आहे.लेह-लडाखसारख्या दुर्गम आणि निसर्गरम्य भूमीत होणारे यंदाचे संमेलन मराठीसाहित्याच्या वैश्विक वाटचालीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून अमरावतीच्यासुपुत्राला जागतिक स्तरावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदाचा मान प्राप्त होणे हीअभिमानाची बाबा असून यासाठी त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
