आश्विन सोमवती अमावस्या निमित्त सोमवती सोहळा व चंदनउटी उत्सव; भक्तांची होणार गर्दी
चांदूर रेल्वे/तालुका प्रतिनिधी
“चला जाऊ सावंगपुरी, गडे हो भक्तांचे माहेरी… तिथे नांदतो हरी, हेच होय पुंण्याची पायरी!”
या ओवीने भरलेल्या भक्तिरसात यंदा आश्विन सोमवती अमावास्या निमित्त श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) नगरीत सोमवती सोहळा व पारंपरिक चंदनउटी उत्सव आयोजित करण्यात आला आहे.श्री विठोबा संस्थानतर्फे विशेष विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दि.८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ७ वाजता संस्थान मध्ये दिपावली निमित्त महाराजांची गाथा पूजन कार्यक्रम विश्वस्त मंडळ व भाविकांचे उपस्थितीत संपन्न होणार आहे. सोमवार दि.९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता खोलाड नदी तीरावर सोमवती निमित्त स्नानाचा कार्यक्रम भजनासह आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता विधीपूर्वक चंदन उटी उत्सवाची सुरुवात होईल. अवधूत परंपरेच्या भजन गायनाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. संस्थानच्या वतीने सर्व भाविकांना या पवित्र सोहळ्यात तन-मन-धनाने उपस्थित राहून भक्तीचा आनंद लुटण्याचे आवाहन करण्यात आले.सर्व भाविक भक्तांना संस्थान तर्फे दिपावली च्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा. ही शुभ दिपावली सर्वांना सुख,समृद्धी,आनंदीमय व भरभराटीची जावो,हिच सदिच्छा.या सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त सहकार्य करण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम वै.नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर रा.राऊत, सचिव अशोक ह.सोनवाल, तसेच विश्वस्त वसंत चो.शेंडे,गोविंद रा.राठोड, फुलसिंग रु.राठोड, चरणदास ना.कांडलकर, प्रविण ना.कुकडकर,लक्ष्मण दि.राठोड,विष्णू कि.राठोड, वैभव दि.मानकर,स्वप्नील ब.चौधरी आणि समस्त कर्मचारी वृंद यांनी केले आहे.
