धामणगाव रेल्वे /तालुका प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित धामणगाव रेल्वे ची सर्वसाधारण सभा शनिवार दि.१८ जुलै २०२६ ला सायंकाळी ५ वाजता भिखराज गोयनका नगर परिषद प्राथमिक कन्या शाळा, धामणगाव रेल्वे येथे संपन्न झाली.
संस्थेच्या अध्यक्षा तथा सभाध्यक्षा पुष्पा गुरदे,प्रमुख अतिथी श्री विठोबा संस्थान,सावंगा विठोबा चे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, नगर परिषद गट नेता तथा तज्ज्ञ संचालक नरेंद्र चौधरी,उपाध्यक्ष अनिल बेलोनकर, सचिव मोईनूर रहेमान,नगर परिषद शिक्षण प्रशासन अधिकारी तथा संचालक उमेश गोंडीक,संचालक म.जाकीर सर,संचालक म.असद अ.अजिज,संचालक दिपक धुमाळ,संचालक वासुदेव देशमुख,संचालक दिगांबर हिरुळकर,संचालिका कु.बेबीनाज अ.रसिदखा यांचे उपस्थितीत लक्ष्मी मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या सभेत विषय सूचीनूसार संचालक मंडळांनी विषय सभेत ठेवून सभेची मंजूरी घेण्यात आली. संस्थेच्या प्रगती करिता संचालक मंडळ सदैव प्रयत्नशील असून संस्थेच्या सभासदांनी कर्जाचे हप्ते नियमित भरणा करून संस्थेला सहकार्य करावे असे मोलाचे मार्गदर्शनपर आवाहन करण्यात आले.या वेळी संस्थेच्या सर्व सभासदांना लाभांश,भेट वस्तू आणि सुरुची भोजन देण्यात आले. या सभेचे संचालन व्यवस्थापक अमोल राऊत व आभार प्रदर्शन संचालिका ललिता उंदरे यांनी केले.
