तीन आमदारांसह महाराष्ट्र विधानमंडळ अवर सचिव यांचा विद्यापीठात पाहणी दौरा..
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे दि.२९/०४/२०२६ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे आमदार मा. श्री अर्जुन खोतकर(जालना), मा. आमदार श्री बालाजी कल्याणकर( नांदेड), मा. आमदार श्री कैलास पाटील(उस्मानाबाद) तसेच महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव मा.श्री दामोदर गायकर आदी पदाधिकाऱ्यांनी रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाची पाहणी केली.रिद्धपूर येथे विद्यापीठात आगमनानंतर लगेच मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर परिसरात उपस्थित सर्व आमदार महोदयांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या सहकार्यांने वृक्षारोपण करण्यात आले. व त्यानंतर आमदार महोदय यांनी विद्यापीठ परिसरातील कामकाजाची पाहणी करत आढावा बैठक घेतली. मराठी भाषा विद्यापीठातील अमराठी भाषिकांसाठी चालणारे प्रमाणपत्र अभ्यासक्रम महाराष्ट्रातील सर्व प्रशासकीय अमराठी कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य करण्यात येईल असे आश्वासन आमदार महोदयांनी मराठी भाषा विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. कोमल ठाकरे यांना बैठकी प्रसंगी दिले.मराठी भाषा विद्यापीठाचे कला व साहित्य प्रशालाचे अधिष्ठाता मा. डॉ. कोमल ठाकरे यांनी सन्माननीय आमदार महोदय श्री अर्जुन खोतकर(जालना), मा. आमदार श्री बालाजी कल्याणकर( नांदेड), मा. आमदार श्री कैलास पाटील( उस्मानाबाद) तसेच अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष, महंत कारंजेकर बाबा यांचा शाल व पुस्तक भेट देऊन विद्यापीठाच्या वतीने सन्मान केला. याप्रसंगी स्थानिक प्रशासकीय यंत्रणा, मराठी भाषा विद्यापीठाचे प्राध्यापकवृंद, सर्व कर्मचारी, व विद्यापीठातील विद्यार्थी उपस्थित होते.
