डॉ. मनीष गवई यांचा हस्ते पथविक्रेत्यांना प्रमाणपत्राचे वाटप
अमरावती- (जिल्हा प्रतिनिधी)
भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालया द्वारा मान्यता प्राप्त हिंदुस्तान स्काऊट्स गाईड्समध्ये अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मनीष शंकरराव गवई यांची निवासी आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल १ मे महाराष्ट्र दिनी तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त डॉ. मनीष शोभा शंकरराव गवई यांचा महापौरांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला असून या प्रसंगी शहीद भंगारात सिंग हॉकर्स युनियनच्या वतीने डॉ. मनीष गवई यांचा हस्ते पथविक्रेत्यांना शासन नोंदणीकृत फूड सेफ्टी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.देशभरातील युवा कल्याण कार्यक्रमाबाबत ध्येय, उद्दिष्ट व कार्यक्रम अंबलबजावणी करण्याकरिता हिंदुस्तान स्काऊट्स अँड गाईड्सची निर्मिती करण्यात आलीं असून अशा संस्थेवर अमरावतीच्या तरुणाची निवड होणे हि अमरावतीला अभिमानाची बाबा आहे.

येत्या १ मे महाराष्ट्र दिनी तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विश्राम भवन आयोजन करण्यात आले असून या सत्कार समारोहाला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अमरावती नगरीचे प्रथम नागरिक महापौर श्रीचंद तेजवानी, उदयसिंगजी चव्हाण अधीक्षक बाजार परवाना अमरावती महानगरपालिका, शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश मारोटकर,विश्व सिंधी सेवा संगमचे राष्ट्रीय कार्यकारी सचिव डेटाराम मनोजा,वैभव निमकर, शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ लोखंडेसह शहरातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करणात आली. यावेळी हिंदुस्तान स्काऊट्स अँड गाईड्सच्या निवासी आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल डॉ. मनीष गवई यांचा महापौरांच्या हस्ते शाल संविधानाची प्रास्ताविका देऊन नागरी सत्कार करण्यात आला.हिंदुस्तान स्काउट्स अँड गाईड्स ही एक स्वयंसेवी, गैर-राजकीय आणि शैक्षणिक युवा संस्था असून तरुणांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी काम करते. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सेवा भावना रुजवणे हा हिंदुस्तान स्काउट्स अँड गाईड्स या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. देश भरातील तरुणांच्या गरजा आणि आकांक्षा तसेच भविष्यातील तरुण पिढी घडविण्यासाठी विशेष युवा कल्याण कार्यक्रम तयार करणे, सरकारला सूचना करणे हे महत्वपूर्ण कार्य हे संघटन करते राष्ट्रस्तरीय दर्जा प्राप्त संघटने मध्ये अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष शंकरराव गवई यांची निवड ही त्यांची सामाजिक तथा युवक कल्याण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर वरील भरीव कामगिरीला पाहून करण्यात आली असून अमरावतीकरिता हि अभिमानाची बाबा आहे. विशेष म्हणजे हे संघटन क्रीडा व युवक कल्याण मंत्रालया द्वारे मान्यता प्राप्त असून ही संघटना विश्व स्वत्रंत स्काऊट फेडरेशनची सदस्य देखील आहे. अमरावतीच्या तरुणाला अशी राष्ट्रीय स्तरावर संधी प्राप्त होणे ही अमरावतीच्या तरुण पिढीसाठी गौरवाची बाबा असल्याचे प्रतिपादन महापौर श्रीचंद तेजवानी यांनी केले.कार्यक्रमात शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन संघटनेच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष सुरत चढार, वंदनाताई शिरभाते, रितेश पुरी राम राठोड, दिनेश भाऊ हरणे, सचिन तेलमोरे, राहुल गाखरे, राजा साहू, साद मीरावाले, जयवंत पवार, अंकुश तळकीत, हर्षद इंगोले, रुपेश खंडारे, जय कपिले, अभय रायेकवार, रिता लोखंडे, वंदना शिरभाते, प्रीती मेश्राम, खंडारे बबीता माकोडे, मनीषा वाणी, कांता खडसे, आशा इंगळे, पूनम धोटे, मंगला श्रीराव, सपना कपिले, सुनिता बनसोड यांच्यासह ५०० ते हजार पथविक्रेत्यांना शासन नोंदणीकृत फूड सेफ्टी प्रमाणपत्राचे वाटप देखील डॉ. मनीष शंकरराव गवई यांच्या हस्ते करणात आले. आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ गवई यांनी महापौर श्रीचंद तेजवानी यांचे आभार मानले आणि हा सत्कार माझा नसून अमरावतीच्या मातीचा असल्याचे प्रतिपादन करून पथविक्रेत्यांना पाठीशी खंबीरपणे उभे असलयाचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले कार्यक्रमांचे सूत्रसंचालन दिनेश भाऊ हरणे यांनी केले असून आभार डेटाराम मनोजा यांनी मानले. युवा कल्याण क्षेत्रात डॉ.गवई यानी समाजासमोर तरुण पिढीला नवचेतना प्रदान करण्याचे काम केले आहे. युवकांना सशक्त करण्यासाठी देशभर व देशाच्या बाहेरही जनजागृती करण्याच्या उद्देशाने डॉ. गवई यानी युवकांना सशक्त करण्याचे काम गेल्या अनेक वर्षपासून करीत आहे. युवकांमधे राष्ट्रप्रेम,सर्वधर्म समभाव,विश्व शांति करीता युवा विचारप्रणाली करीता अंतर्राष्ट्रीय पातळवर देखील या विषयाला घेऊन त्यानी युवा शक्तिकरणाबाबत प्रभावी कार्य केले असून त्यांनी राष्ट्रबांधणीत – राष्ट्रविकासात युवकाचा सहभाग, युवा सह-विचार आदान प्रदान, विश्व मैत्री करीता युवा विचारांची गरज यावर प्रकाश टाकला आहे. डॉ. मनीष गवई यांच्या रूपाने अमरावतीचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकले आहे.
