आरोग्यसेवेसोबतच विद्यार्थ्यांना वाचनाची सुविधा; स्वातंत्र्य दिनी गावाच्या विकासात दोन महत्त्वपूर्ण सुविधांची भर
अंजनगाव बारी / पवन इंगोले
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पार्डी (देवी) येथे आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्राच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा तसेच ग्रामपंचायतीच्या वाचनालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले. ठीक दुपारी १२ वाजता राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमास बडनेरा मतदार संघाचे आमदार रवि राणा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्डी (देवी)चे सरपंच अक्षय मेश्राम होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. नव्या वाचनालयामुळे विद्यार्थ्यांसह स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना तसेच ग्रामस्थांना अभ्यास व वाचनासाठी हक्काची सुविधा उपलब्ध होणार आहे.

यावेळी बंडू डकरे, दिनेश टेकाम, अजय घुले, पोलीस पाटील नितीन बेंडे, सुभाष खंडार, प्रतिभा बनसोड, अरुण मडके, राजू पिसे, जगदीश अंबाडकर, रक्षणा सरदार, सुनील राऊत, डॉ. मधुकरराव पिसे, सुनील निचत, जितेंद्र भस्मे, मनोहर पिसे, पुरुषोत्तम घटारे, प्रवीण पिंगळे, बबन ढेंबरे, मुकुंद होळकर, ओंकार मोहोड, प्रवीण सोनवणे, आशिष गोळे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. शरद जोगी, साथरोग अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती; डॉ. मंगला मोहोड, वैद्यकीय अधिकारी, अंजनगाव बारी; स्वप्नील चवरे, तालुका अधिकारी कार्यालय; लकडे ताई, जिल्हा परिषद अमरावती; अविनाश भुगुल; पोकळे भाऊ, आरोग्य सहाय्यक; कुंदा राऊत, आरोग्य सहाय्यिका यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, महिला बचत गट तसेच पार्डी गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. माधुरी ननीर (समुदाय आरोग्य अधिकारी), वर्षा राठोड (आरोग्य सेविका), कालिंदी धनवीज (आरोग्य सेविका) तसेच आशा सेविका निर्मला सोनोने, रत्नमाला खडसे, पल्लवी वाकोडे, ममता सुखदेवे, वंदना रामटेके व चैतन्या वहाने यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्यासोबत अभिनंदन वहाने, प्रशांत शेंडे, वैभव पिसे, सुनील वहाने, धम्मदीप वासेकर, संजय ठाकरे आदींनी सहकार्य केले.तसेच निलेश महाले, प्रीतम मेश्राम, प्रतिक बावनकुळे, नितीन ढेबरे, विकी जाखड, शांतीलाल जाखड, अण्णा इंधाने, शुभम वडुरकर, शुभम राऊत, रोशन डोंगरे यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्राची सुसज्ज नवीन इमारत आणि ग्रामपंचायतीच्या वाचनालयाच्या माध्यमातून पार्डी गावातील नागरिकांना आरोग्यसेवेसोबतच ज्ञान व वाचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर गावाच्या विकासात दोन महत्त्वपूर्ण सुविधांची भर पडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
