अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनिष गवई यांचां पुढाकार
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या माध्यमातून केली अमित शाह यांना मागणी
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत म्हणून ओळखले जातात. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे.

तुकडोजी महाराजांनी इ.स. १९३५मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते., त्यांनी ग्राम प्रबोधन क्षेत्रात केलेली कामगिरी आणि त्याचा समाजव्यवस्थेवर झालेला परिणाम गौरवास्पद आहे.

अशा वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना आजपावेतो भारतरत्न हा सर्वोच्च खिताब प्राप्त झालेला नाही. ही फार खेदाची बाब असून या संदर्भात अमरावतीतुन वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्यासाठी जन आंदोलन मोहीमीची सुरूवात करण्यात आली असून त्यासाठी अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याणविभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या राज्यपाल माजी नामित सिनेट सदस्य, खाजगी सचिव व निवासी आयुक्त डॉ. मनिष शोभा शंकरराव गवई यांच्या पुढाकाराने, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या माध्यमातून केली अमित शाह यांना मागणी करण्यात आली असून तसे पत्र देखील केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांना देण्यात आले आहे.

यापूर्वी देखील डॉ. मनिष गवई यांनी वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्यासाठी दिल्लीच्या जंतरमंतर येथे एक दिवसीय अन्न उपवास सत्याग्रह व ग्रामगीतेचे वाचन करून या मागणीला निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रपती व प्रधानमंत्री कार्यालयाला पर्यंत पोहोचविले आहे. येत्या २६ जानेवारी २०२७ पर्यंत तशी घोषणा करावी ही मागणी देखील त्यांनी आपल्या निवेदनात केली आहे.वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प् प्रबोधनाचे कार्य केले आहे. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.

सन १९४२च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्मयसेवेची पूर्तीच होय. खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्नग होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्नि केले.सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते. त्यामुळे त्यांना भारतरत्न सन्मान देणे महत्वाचे आहे त्या अनुशंघाने महाराजांचे विचार देशातील काना कोपऱ्या पर्यंत पोहोचतील. यासाठी अमरावतीचे सुपुत्र असलेले आणि दिल्लीत कार्यरत असणारे डॉ. मनिष गवई यांनी सुद्धा वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री रामदास आठवले यांना निवेदन सादर केले आणि तात्काळ श्री रामदास आठवले यांनी या मागणीला आपला पाठिंबा देत डॉ. मनिष गवई यांच्या निवेदनाची दखल घेत निवेदन थेट केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांना पाठविले आहे. येत्या अधिवेशन काळात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री रामदास आठवले आणि डॉ. मनिष गवई हे अमित शाह त्यांची भेट घेऊन वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. या पूर्वी देखील डॉ. मनिष गवई यांनी २४ ऑक्ट २०२५ रोजी वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्यासाठी दिल्लीच्या जंतरमंतर येथे एक दिवसीय अन्न उपवास सत्याग्रह व ग्रामगीतेचे वाचन करून या मागणीला निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रपती व प्रधानमंत्री कार्यालयाला पर्यंत पोहोचविले आहे.येत्या २६ जानेवारी २०२७ पर्यंत वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची घोषणा करावी ही मागणी देखील त्यांनी आपल्या निवेदनात केली आहे. डॉ. मनिष गवई यांनी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल अमरावतीतील गुरुदेव प्रेमींनी डॉ. गवई यांचे अभिनंदन व आभार मानले आहे.
