९ सुवर्ण व ८ रौप्य पदकांची कमाई; १६ विद्यार्थ्यांनी मिळविले यश
अंजनगाव बारी / प्रतिनिधी
अंजनगाव बारी येथील Boxing Club Anjangaon Bari च्या विद्यार्थ्यांनी अमरावती जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत दमदार कामगिरी करत ९ सुवर्ण व ८ रौप्य पदके पटकावली. या यशामुळे क्लबच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती आणि किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ अमरावती डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने १७ व १८ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, मार्डी रोड, तपोवन गेट, अमरावती येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १४, १७ व १९ वर्षांखालील मुले-मुली या वयोगटांत स्पर्धा पार पडली.तन्वी ठाकरे, तनीश अंबाडकर, जान्हवी गुर्जर, रिया झोंबाळे, प्रगती म्हैसकर, हिमांशू खाडे, मयंक खडसे, पवन दारोकर आणि संकेत गुर्जर.नैना शेलोकार, दैवयानी बनसोड, दैवयानी खडसे, परी पकडे, अर्जुन पुनिया, कृष्णा पुनिया, तन्वी भुरे आणि अर्णवी वसुले.या स्पर्धेत अंजनगाव बारी येथील जनता विद्यालयाच्या ६ विद्यार्थ्यांसह राजेश्वरी युनियन हायस्कूलच्या १० विद्यार्थिनींनी यश संपादन केले. खेळाडूंना कोच किशोर ठाकरे, ललिता ठाकरे आणि तेजस्विनी ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी,पालक व नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
