शेकडो स्पर्धकांनी घेतला सहभाग
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी धनश्री सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.मागील सहा वर्षापासून सातत्याने लावणी नृत्य स्पर्धा धनश्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येते.यावर्षी प्रथमच राज्यस्तरीय विविध प्रकारच्या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये बॉलीवूड, हॉलीवुड, क्लासिकल, वेस्टन, लावणी सह नृत्याचे विविध प्रकार यावर्षी बघायला मिळाले..एकूण ८५ स्पर्धकांनी या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत सहभाग घेतला होता संपूर्ण महाराष्ट्रातून नृत्य कलाकार या स्पर्धेत सहभागी झाले होते ठाणे, गडचिरोली, नांदेड, वणी, कोल्हापूर, चिमूर,यवतमाळ,नागपूर,पुणे येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रेया पाटणकर, (ठाणे) अद्विता राऊत( अमरावती)
द्वितीय क्रमांक जास्मिन शेख ( नागपूर) अर्शद खान ( नागपूर)
तृतीय क्रमांक लावण्या आगलावे, श्रेया मोटघरे तर प्रोत्साहन पर बक्षीस डेनिस राऊत, रितेश चव्हाण, संयुक्त ढवळे,
एकल नृत्य स्पर्धेत विजेते
प्रथम क्रमांक इशिता बरवड, अथर्व ढोले ( नागपूर)
द्वितीय क्रमांक ओवी राऊत,सूरज नमस्कार
तृतीय क्रमांक अविनाश काळे, समीर मसराम, प्रोत्साहन पर विजेते लाभिका देशमुख,रीतिषा चौधरी, दिव्या मोहोड, गौरी महाजन, डॉ.निधी सोनवणे, अमित पवार ग्रुप नृत्य स्पर्धेत
प्रथम क्रमांक ए प्लस ए ग्रुप ( अमरावती)
प्रोत्साहन पर हनी डान्स ग्रुप
तर डुएट डान्स मध्ये
विजेते ओवी व लभिका इत्यादी स्पर्धकांनी विजेते पद मिळविले.

शनिवार दिनांक २३ मे रोजी स्मृतीशेष सचिन चौधरी सभागृह जिजाऊ प्रतिष्ठान मराठा नगरी रहाटगाव येथे सकाळी ११ वाजता पासून ते रात्री दहा वाजेपर्यंत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सकाळच्या सत्रात या स्पर्धेच्या उद्घाटनाला अमरावती शहरातील प्रथम नागरिक महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणून स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विन चौधरी, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके,नगरसेवक मंगेश मनोहरे सुप्रसिद्ध लेखक वक्ता प्रेमकुमार बोके,प्रीती ताई साहू,श्रुती आगलावे, ॲड.निता डाखोडे,यांची उपस्थिती होती तर बक्षीस वितरण समारोप कार्यक्रमाला मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षिका कीर्ती चिंतामणी मॅडम , सुप्रसिद्ध रील स्टार प्रज्ञा राऊत, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष जयश्री वानखडे, जिजाऊ प्रतिष्ठानचे सचिव प्रकाश राऊत, साई कोचिंग क्लासेस चे संचालक दिलीप हटवार, यांच्या हस्ते राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत सहभागी विजेत्यांना रोख पारितोषिक सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध कोरिओग्राफर मनीष पाटील,आकाश बिजवे, सर्वश्री जुनघरे यांनी केले.या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन धनश्री प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष पल्लवी यादगिरे वैध, कु आराध्या ठाकरे,प्रीती गवई,यांनी केले. संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या अध्यक्ष मंजू ठाकरे ,सचिव आरती बोंदरकर, कोषाध्यक्ष सुचित्रा लहाने , सहकोषाध्यक्ष कुंदा पुसंदकर, सदस्य कविता वाटाणे, कविता कचवे, किरण गहूकर ,ज्योती हजारे , स्वाती काळे, विजया काळे, वैशाली शिर्के, अबोली वानखडे, स्नेहल वानखडे यांनी परिश्रम घेतले.
