मंदिर महासंघाच्या पाठपुराव्यामुळे कोट्यवधींची जमीन सुरक्षित!
चांदूर रेल्वे तहसीलदारांचा ऐतिहासिक निर्णय: कुळ कायद्याखालील जमीन खरेदीचा अर्ज फेटाळला
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
शेंदुरजना बाजार (ता. तिवसा, जि. अमरावती) येथील श्री मारोती देवस्थानच्या मालकीची असलेली आणि कोट्यवधी रुपयांचे मूल्य असलेली शेतजमीन लाटण्याचा प्रयत्न प्रशासनाने हाणून पाडला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या सजगतेमुळे आणि पाठपुराव्यामुळे चांदूर रेल्वेच्या तहसीलदारांनी कुळ खरेदी हक्काचा अर्ज फेटाळून लावला.
असून देवस्थानच्या हक्कावर कायदेशीर शिक्कामोर्तब केले आहे.श्री मारोती देवस्थान (शेंदुरजना बाजार) यांच्या मालकीची चांदूर रेल्वे (भाग-१) येथील गट क्र. ६३ ही ०.७९ हेक्टर शेतजमीन आहे. ही जमीन नगरपरिषद हद्दीत येत असल्याने तिचे बाजारमूल्य अत्यंत जास्त आहे. या जमिनीतून मोठा आर्थिक फायदा करून घेण्याच्या हेतूने दामोदर रामभाऊ नागमोते यांनी कुळ कायद्यानुसार खरेदीचा अधिकार मिळवण्यासाठी चांदूर रेल्वेचे तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण यांच्याकडे अर्ज दाखल केला होता व त्या अनुषंगाने जमिनीची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.ही गंभीर बाब निदर्शनास येताच महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य पदाधिकारी श्री. अनुप जयस्वाल आणि श्री. विनीत पाखोडे यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यांनी अतिरिक्त गैरअर्जदार म्हणून न्यायालयात भक्कम हरकत नोंदवली. सदर देवस्थान हे नोंदणीकृत धार्मिक संस्थान असून, उपविभागीय अधिकारी यांच्या १४ जून १९६० च्या आदेशानुसार या जमिनीला कुळ कायद्याच्या कलम १२९ (ब) अंतर्गत ‘सूट प्रमाणपत्र’ (Exemption Certificate) प्राप्त असल्याचे त्यांनी पुराव्यासह प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, ही जमीन विक्री प्रक्रिया तत्काळ रद्द करण्याची मागणी केली.या प्रकरणात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि कागदपत्रांची सखोल पडताळणी केल्यानंतर, तहसीलदार पुजा एस. माटोडे यांनी २७ ऑगस्ट २०२६ रोजी महत्त्वपूर्ण निकाल दिला. देवस्थानच्या जमिनीला कुळ हक्क लागू होत नसल्याचे आणि अर्जदार हा मूळ कुळाचा वारस असल्याचे सिद्ध न झाल्याने त्यांनी अर्जदाराचा खरेदी हक्काचा अर्ज नामंजूर केला. या ऐतिहासिक निकालामुळे देवस्थानची कोट्यवधींची मालमत्ता सुरक्षित राहिली आहे.या निर्णायक यशामध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य पदाधिकारी श्री. अनुप जयस्वाल व श्री. विनीत पाखोडे यांच्यासह देवस्थानचे विश्वस्त श्री. सतीश सावरकर, श्री. प्रफुल्ल उमप, श्री राजेन्द्र सावरकर,वामनराव भोजने, भास्करराव बोडखे, जगदिश काळे,प्रविण भोजने, सतिश सावरकर, ओंकार देवळे, श्रीराम लोखंडे, सुधाकरराव सोनटक्के, रामकृष्ण ओलीवकर, प्रफुल्ल उमप,प्रमोद निमकर मोलाचे योगदान लाभले. या यशस्वी कार्यवाहीमुळे संपूर्ण परिसरात आणि भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, देवस्थान व हिंदूंच्या हक्कांसाठी झटणाऱ्या ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ आणि ‘हिंदू जनजागृती समिती’च्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असल्याची माहिती श्रीकांत पिसोळकर श्री अनुप जयस्वाल, विदर्भ समन्वयक, राज्य पदाधिकारी, महाराष्ट्र मंदिर महासंघ महासंघ महाराष्ट्र मंदिर महासंघ महासंघ,संपर्क: ७०५७३६८८६० संपर्क: ७०२०५१५०९५ यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.
