- आरोग्य विभाग आणि लोकप्रतिनिधींनी घेतले झोपेचे सोंग
करोडो रुपयांच्या इमारती पडल्या धूळखात
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आरोग्य यंत्रणा या कमालीच्या डबघाईस आलेल्या असून आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकारी आणि या मतदार संघाच्या लोकप्रतिनिधींच्या अनास्थेपायी करोडो रुपयांच्या प्रशस्त इमारतीचे बांधकाम झाले खरे परतू त्यामध्ये आवश्यक सोईसुविधा आणि अधिकारी,कर्मचारी वर्गाच्या रिक्त जागाचं भरण्यात आलेल्या नसल्याने तालुक्यातील बांधकाम झालेल्या प्रशस्त इमारती या शोभेच्या वास्तू झाल्या आहेत यामध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी आरोग्य विभागाच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आजपर्यंत पर्यंत काहीच कारवाई केली नसल्याचे दिसते. एवढेच नाही तर या इमारतीमध्ये दवाखाने अद्यापपरेंत का सुरू झाले नाहीत ? याबाबत या विभागाच्या कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत साधी एकही आढावा बैठक लाऊन याबाबत पाठपुरावा केल्याचे दिसत नाहीत यावरून असे दिसून येते की त्यांना नांदगाव खंडेश्वर तालुक्याशी काहीही देणेघेणे नाही तालुक्यात आरोग्य विभागाच्या बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीमध्ये. वेणी गणेशपूर,कंझरा,फुबगाव येथील आरोग्य उपकेंद्रे सुरू झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले असले तरी हे उपकेंद्रे एखादा सोडला तर उर्वरित नियमित सुरूच राहत नाहीत यामध्ये पूर्ण कर्मचारी,अधिकाऱ्याच्या जागाच भरण्यात आलेले नाही हे या तालुक्याचे भीषण वास्तव आहे.त्यामुळे या तालुक्याला कुणीच वाली नसल्याचे दिसून येते हे लोकप्रतिनिधी फक्त पेपरबाजी करण्यातच आपली धन्यता मानत असून त्यांना विकास कामाशी काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येते.
कार्यालयाला वॉल कंपाऊंड नसल्याने मोकाट जनावराचा हैदोस
नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात तालुका आरोग्य विभागाचे प्रशस्त असे कार्यालय बांधण्यात आले आहे.आणि त्याच्या आजुबाजूला येथील कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने विविध प्रकारचे झाडे लावून अत्यंत सुंदर असा बगीचा तयार केला आहे. परंतु याला भिंतीचे वालकंपाऊंड नसल्याने मोकाट जनावरे ही सर्व झाडे खाउन तोडून टाकत असल्याने कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरल्या जात असल्याचे या कार्यलया भोवती भिंतीचे वालकंपाऊंड बांधण्याकरिता जी.प.च्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला परंतु त्यांनि अद्यापही डोळे उघडले नसुन याबाबत कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही ते फक्त आपल्या खुर्चीची दिवसभर शोभा वाढवत असल्याच्या चर्चा संपूर्ण जिल्हा परिषदेत चर्चिल्या जात आहे.
स्वतंत्र मीटिंग हॉलच नाही तर T.M.O. नी कर्मचाऱ्यांच्या मीटिंग घ्यावा तरी कश्या ?
तालुका आरोग्य अधिकारी यांना स्वतंत कार्यालय मिळाले खरे परंतु प्रत्येक महिन्याला तालुक्यातील सर्व आरोग्य अधिकारी कर्मचारी,आणि आरोग्य सेविका यांच्या मीटिंग घेण्याकरिता या कार्यालयात जागाच नाही त्यामुळे कधी पंचायत समिती,कधी तहसील कार्यालयात तर कधी ग्रामीण रुगालयाच्या सभागृहात तालुका आरोग्य अधिकारी यांना मीटिंग घ्यावी लागते त्यांना कधी मीटिंग करीता कधी जागा मिळते तर कधी नाही त्यामुळे मोठी कसरत करावी लागत असून याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे या कार्यालयाला एक २० बाय ४० चौ.मी.चा सर्व सुविधा युक्त मीटिंग हॉल बांधून देण्यात यावा अशी मागणी या विभागाच्या लोकप्रतिनिधींसह,जिल्हाधिकारी,जिल्हा नियोजन अधिकारी, आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला परतू अद्यापही काहीच फायदा झालेला नसल्याने या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आता दाद मागावी तरी कुणाकडे असा प्रश्न निर्माण होत आहे.
ना शासकीय वाहन ना भत्ता अधिकाऱ्यांचा खाजगी वाहनाने प्रवास तरीही भाडे मिळेना
या तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी यांना तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा,धामक,सातारगाव,लोणी टाकळी,आणि पापड येथील आरोग्य केंद्र आणि या अंतर्गत येणारे आरोग्य उपकेंद्र याना दररोज प्रत्यक्ष भेटी द्यायला आरोग्य विभागाचे स्वतंत्र शासकीय वाहनच नसल्याने आरोग्य अधिकारी यांना इतर अधिकारी,कर्मचारी यांच्या खाजगी वाहनाने प्रवास करून भेटी द्याव्या लागतात आणि ही वाहने सुद्धा कधी मिळते तर कधी नाही त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही आरोग्य केंद्रांना भेटी देता येत नसल्याने तालुक्यातील नागरिकांचा आरोग्य अधिकारी यांच्यावर रोष वाढत आहे सुमारे वीस वर्षापूर्वी तालुका आरोग्य विभागाकडे स्वतंत्र शासकीय वाहन उपलब्ध होते परंतु ते वाहन आता डिस्मेंटल झाल्याने तेव्हापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे वाहन उपलब्ध करूनच दिलेले नाही आणि वाहन देण्याबाबत शासनासोबत कोणताही पाठपुरावा केलेला यावरून असे दिसून येते की,या विभागाच्या लोकप्रतिनिधींना या महत्वपूर्ण विषयाबाबत सुद्धा शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी वेळच मिळत नाही.त्यामुळे अधिकाऱ्यांनी काम करावे तरी कसे ? असा प्रश्न निर्माण होतो आहे. या ठिकाणी महिला आरोग्य अधिकारी असल्याने त्यांना काम करताना अनेक समस्या निर्माण होत आहेत. पुरुष अधिकारी असले तर ते दोनचाकी वाहनाने सुद्धा तालुक्याचा प्रवास करू शकतात परतू महिला अधिकाऱ्यांनी काय करावे याचे उत्तर अद्यापही मिळालेले नाही.आणि तालुक्याचा प्रवास करण्यासाठी जर एखादे खाजगी वाहन भाड्याने सांगितले तर यांचे भाडे सुद्धा शासनाकडून मिळत नसून ते अधिकाऱ्यांना आपल्या पगारामधूनच करावे लागते हे जळजळीत सत्य आहे.
