नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चवाळा येथील तरूण उत्साही दुर्गा माता मंडळ नेहमीच आपल्या सामाजिक उपक्रम तसेच विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी यांच्या हितार्थ व सर्वांना व्यासपीठ मिळवून देणारे स्तुत्य कार्यक्रम घेऊन मंडळाने नवरात्रोत्सवामध्ये संपूर्ण जिल्ह्यात एक वेगळेच नाव केले आहे. फक्त दुर्गा मातेची मूर्ती बसविणेच म्हणजे नवरात्रोत्सव नसून समाजोपयोगी कार्यक्रम राबवून सामाजिक सद्भाव निर्माण करणे म्हणजे यशस्वी व प्रभावी नवरात्रोत्सव असतो याचे उदाहरण सादर करणारे मंडळ म्हणजे तरूण उत्साही दुर्गोत्सव मंडळ आहे. मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी तयार करण्यासाठी व त्याची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य व नाट्य स्पर्धा, भजन स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा, संगित खुर्ची, निंबु चमचा स्पर्धा, वृक्षारोपण व परिसर स्वच्छता अभियान, संत महापुरुषांचे विचार रूजविणारे कार्यक्रम त्याचप्रमाणे तरुण उत्साही स्पर्धा परिक्षा वाचनालयाचा वर्धापन दिन सुद्धा साजरा करण्यात आला.

विद्यार्थी गुणगौरव सोहळामध्ये जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरूळ चवाळा मधील वर्ग 1 ते 12 वी पर्यंतच्या प्रथम, द्वितीय व तृतिय क्रमांक पटकाविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गुणगौरव सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे यावर्षीचा तरूण उत्साही दुर्गोत्सव मंडळातर्फे दरवर्षी दिला जाणारा तरुण उत्साही पुरस्कार यावर्षी हनुमान रामाजी शिंदे यांना प्रदान करण्यात आला व त्यांचा त्यांच्या पत्नी वैष्णवी शिंदे यांच्यासह सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे दोन आदर्श विद्यार्थ्यांची सुद्धा यावेळी घोषणा करण्यात आली. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नरेशभाऊ शुक्ला यांचा व सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी नरेंद्रजी घरजारे यांचा सेवानिवृत्त सेवा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील 4 विद्यार्थ्यांनी नवोदय ची परिक्षा उत्तीर्ण केली त्याचप्रमाणे 10वी व 12वी चा बोर्डाचा 100% उत्तीर्ण निकाल लागला व विविध खेळांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी जिल्हा व राज्य स्तरापर्यंत गेल्याने जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षण व मार्गदर्शनामुळे हे होऊ शकले.यावेळी ठाणेदार आर.के. हाके, जि. प. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अजयकुमार कोळी, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विद्याताई गायगोले, सरपंच राजेश पारधी, माजी पं.स. सदस्य तथा मुख्य व्यवस्थापक गणेश अवझाडे, पोलिस पाटील दिपक पिंपळकर, गजानन काकडे, सोनाली माटे, प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या सभापती मिना गुल्हाने, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सागर गावनेर, कडु मॅडम, दिंडुलकर , शिरभाते , तामस्कर, गोम सर, तांबडे, चौधरी, सदाभाऊ देवकते, मंडळाचे अध्यक्ष सतिश शिंदे, उपाध्यक्ष पंकज चरपे, सचिव चेतन करडे, सहसचिव पंजाब सुरजूसे, मनोज नांदुरकर, गौरव गुल्हाने, जय चरपे, विनोद वारकर, विशाल सावरकर, सागर बुधले, कार्तिक अवझाडे, हितेश गावनेर, सुमित बुधले, उमंग गावनेर, आदित्य कुकडे, श्रेयस गंधे, यश वारकर, अनुज राऊत, नंदन काकडे, विराट अवझाडे, कृष्णा गावनेर, ध्रुव राऊत, सर्वज्ञ राऊत, स्नेहा शिंदे, सुनिता वारकर, कल्पना चरपे, पायल गावनेर, मयुरी गावनेर, गौरी वारकर, रितुका राऊत, प्रतिक्षा सोनोने इ. मंडळाचे सदस्य, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक, गावकरी नागरिक, महिला व तसेच मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासह तरुण उत्साही दुर्गा माता मंडळातर्फे आयोजित सर्व कार्यक्रमांचे सुत्रसंचलन व व्यासपीठ नियोजन मनोज गावनेर यांनी केले.
