अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथे नुकत्याच झालेल्या आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवक महोत्सव ( इंद्रधनुष्य निवड फेरी )2026-27 साठी सेंट थॉमस प्रशासकीय महाविद्यालयातील एकूण 35 विद्यार्थ्यांनी या युवक महोत्सवात विविध स्पर्धेमध्ये भाग घेतला.

या मध्ये मुका नाट्य रांगोळी स्पर्धा समुह नृत्य एकल नृत्य, वाद-विवाद स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला पोस्टर मेकिंग स्कीट, माती कला शॉर्ट फिल्म प्रश्नमंजुषा इन्स्टॉलेशन अशा विविध स्पर्धेमध्ये भाग घेतला.यामध्ये भारतीय समूह नृत्यांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांचा तृतीय क्रमांक आला.. इन्स्टॉलेशन व शॉर्ट फिल्म मध्ये प्रथम क्रमांक आला असून शॉर्ट फिल्म व इन्स्टॉलेशन मधील विद्यार्थ्यांची निवड नाशिक येथे झाली असून आमच्या महाविद्यालयाचे व आमच्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या युवक महोत्सवासाठी प्राचार्य संजीवनी मनवरे, प्रा. सुमेध गावंडे, प्रा. कल्पना राऊत, प्रा. उज्वला सुरजे, प्रा.शांता गाडगे, प्रा.स्वप्नील ईखार, यांनी परिश्रम घेतले.
