अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी येथील ओम इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर सायन्स कॉलेजची इयत्ता 8 वी ची विद्यार्थिनी कु आराधना गोपाल अस्वार जिल्हास्तरीय योगा स्पर्धेमध्ये चौथा क्रमांक व जिल्हास्तरीय रीदम योगा स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकाविला. तिला क्रीडाशिक्षक श्रीकृष्ण धारपवार यांनी प्रशिक्षण दिले. या यशाबद्दल ओम चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष मा. श्री दिनेशजी भोंडे, सौ वैशालीताई दिनेशजी भोंडे, श्री राजेशजी बोडखे, डॉ राजेशजी धुर्डे, डॉ पुजाताई राजेशजी धुर्डे, कोषाध्यक्ष श्री जीतेंद्रजी कटारमल, सौ सोनलताई जीतेंद्रजी कटारमल, प्राचार्य डॉ पुजाताई हनवंते यांनी कौतुक केले.
