माझ्या जीवनातील आई हा माझा पहिला गुरु
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
भारतात दरवर्षी ५ सप्टेंबररोजी ‘शिक्षक दिन’ साजरा केला जातो. शिक्षकांच्यायोगदानाला आदराने गौरवण्यासाठी आणि भावी पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा दिवसमहत्त्वाचा आहे. भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याजन्मदिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. शिक्षक दिन हा शिक्षकांनी ज्ञानआणि मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या योगदानाला आदरानेस्वीकारण्याचा दिवस आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्तकरण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिवस असे प्रतिपादन डॉ.मनीष शंकरराव गवई अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा वयुवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्कसंघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेटसदस्य तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेषकार्यकारी अधिकारी यांनी केले ते श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारासंचालित कस्तुरबा कन्या शाळा,शाम नगर अमरावती या ठिकाणी शिक्षक दिन कार्यक्रमात प्रमुख अतिथीम्हणून बोला होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणूनशाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय सौ. अर्चनाताई लुंगे मॅडम या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिकासन्माननीय अर्चनाताई लुंगे,पर्यवेक्षिका स.श्रीमती एस. जी.चंदेलमॅडम,वर्गशिक्षिका सौ. पी.एम.नावंदर मॅडमउपस्थित होत्या.
सर्वप्रथम डॉ.सर्वपल्लीराधाकृष्णन आणि डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. डॉ गवई आपल्यामार्गदर्शनात पुढे म्हणाली कि आई हा माझा पहिला गुरु आहे, पण माझ्या बुद्धिमत्तेला आणिविचारशक्तीला जे घडविण्याचे श्रेय आहे ते माझ्या शिक्षकांचेच आहे. आज याव्यासपीठावर उभा राहून आत्मविश्वासाने बोलण्याचे धाडस मला मिळाले, तेही माझ्या आयुष्यात भेटलेल्या त्यासर्व शिक्षकांमुळे. त्यांच्या ज्ञानप्रकाशामुळेच आज माझ्या शब्दांना धार आलीआहे.इतिहासाचा मागोवा घेतला तर लक्षात येते की प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागेएखाद्या गुरुचे मार्गदर्शन असतेच. गुरु शिष्याबरोबर शारीरिक स्वरूपात नसला तरीत्याची शिकवण, त्याचे विचार हे शिष्याच्या प्रत्येककृतीतून जिवंत राहतात.प्रेरणादाता, ज्ञानसंचारक,मार्गदर्शक, संस्कारदाता, आत्मविश्वास देणारा, जीवनकौशल्य शिकवणारा – अशी अनेक रूपे फक्त एका व्यक्तीमध्येदिसतात आणि ती व्यक्ती म्हणजे गुरु.ज्यांच्या लेखणीतून प्रकटलेले शब्द जणूपरिवर्तनाचे शंखनात करतात आणि ज्यांच्या वाणीतून निघणारे विचार हे प्रेरणेचे झरेठरतात असे प्रमुख वक्ते सन्माननीय डॉ.मनीष शंकरराव गवई यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व भाऊसाहेबांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले.नुकताचजाहीर झालेला “उत्कृष्ट मुख्याध्यापिका “हा पुरस्कार संस्थेने शाळेच्यामुख्याध्यापिका सन्माननीय अर्चनाताई लुंगेमॅडम यांना बहाल केला.त्याबद्दल मॅडमचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .त्यानंतर विद्यार्थिनींनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर भाषणेदिले.विद्यार्थिनींनी सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ व शुभेच्छापत्र देऊन आदर व्यक्तकेला.संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन वर्ग 10 (ब )कडे असल्यामुळे वर्ग 10(ब ) च्या वर्गशिक्षिका सौ. पी.एम.नावंदर मॅडम यांच्या मार्गदर्शनातहा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमानंतर शिक्षकांच्या वेशभूषेतील विद्यार्थिनींनीस्वयंशासित विद्यालय घेतले.विद्यार्थिनींनी शिक्षकांची भूमिका निभावली.शाळेचेसंपूर्ण कामकाजन चालवले.दिवसभराचा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. स्वयंशासितविद्यालयामुळे विद्यार्थिनींना शालेय जीवनातील जबाबदाऱ्या व व्यवस्थापनाचाप्रत्यक्ष अनुभव आला.
