मुंबई / प्रतिनिधी
मुंबई, रायगड जिल्ह्याला आणि पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट तर, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती,चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (#INCOIS) तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांना दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११.३० वा. ते दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत ३.५ ते ४.३ मीटर तसेच पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून ते दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत ३.५ ते ४.२ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
#पाऊस
#मान्सून
#हवामानअंदाज
#WeatherUpdate
