
संत गाडगेबाबा मंडळ भाजपा अमरावती तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन
अमरावती / रामचंद्र मुंदाने
संत गाडगेबाबा मंडळ भाजपा अमरावती शहर च्या वतीने संकल्प करूया आरोग्य आयुष्याचा आंतरराष्ट्रीय 11 व्या योग दिन कार्यक्रम संपन्न झाला .दरवर्षी 21 जून रोजी योगामुळे होणाऱ्या अनेक आरोग्य विषयक फायद्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी माननीय नितीन भाऊ धांडे अध्यक्ष भाजपा शहर जिल्हा अमरावती यांच्या सूचनेनुसार संत गाडगेबाबा मंडळ अंतर्गत 21 जून रोजी सकाळी सहा वाजता स्वामी विवेकानंद थीम पार्क कठोरा नाका येथे योग गुरु पतंजली पिठाचे योग शिक्षक सुधीरभाऊ आसटकर व कोहळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिर संपन्न झाले.
या आंतरराष्ट्रीय योग शिबिर कार्यक्रमाला संत गाडगेबाबा मंडळ अध्यक्ष माननीय अभिजीत उर्फ छोटू वानखडे, बादलभाऊ कुलकर्णी प्रदेश सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा, सुरेखाताई लुंगारे माजी नगरसेविका, रिता ताई मोकलकर माजी नगरसेविका, स्वातीताई निस्ताने, धनराज जी चक्रे अध्यक्ष अनुसूचित जाती श्याम भाऊ पाध्ये शहर उपाध्यक्ष, धीरज भाऊ बारबुद्धे शहर उपाध्यक्ष ,राजेश भाऊ गोफने सरचिटणीस किसान मोर्चा, संत गाडगेबाबा मंडळाचे ज्येष्ठ सभासद सर्जेराव गणपत काका,अमोल आगरकर सरचिटणीस, आकाश दानखडे सरचिटणीस, गणेश खोत, आकाश जाधव , अर्चनाताई पुंड, संगीताताई तोंडे, माहुरे ताई, अतुल देशमुख, अरुणराव मोरे, लुंगारे साहेब, अनुप देशमुख, संतोष गोरले, श्रीकांतभाऊ इसोकार, कृष्णा राऊत, सुरज गावंडे,अभी कावरे, प्रकाश अटाळकर, तुळशीदास माने, मोहन वाकोडे, दीपक कवटकर, सुनील भुजाडे, करडे सर, व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते .