पंचक्रोशी कार्यक्रम,भव्य-महाप्रसाद,काकड आरती समाप्ती कार्यक्रम, कार्तिक मास मांड वाढवा सोहळा
चांदूर रेल्वे /तालुका प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे श्री विठोबा संस्थान अर्थात श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थानच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त चंदनउटी व रमणा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या धार्मिक सोहळ्याची भाविकांमध्ये उत्सुकता असून, उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
या उत्सवाचे आयोजन मंगळवार दि.२४ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता संस्थान मधून पंचक्रोशी कार्यक्रमाला आरंभ ग्रामस्थ व भाविक भक्तासह भजनाचे गजरात करण्यात येईल.याबाबतचे नियोजन संस्थान तर्फे करण्यात आले आहे.दुपारी ३.३० वाजता चंदनउटी व रमणा सोहळ्याला सरुवात होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता भाविक-भक्त आणि समस्त ग्रामस्थांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थानच्या अन्नदान समितीच्या वतीने आयोजित नियोजनातून महाप्रसाद वितरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.रात्री आरतीनंतर कार्तिक मास निमित्त संस्थान मध्ये दैनंदिन काकड आरती कार्यक्रमाची सांगता ग्रामस्थ व भाविकांसह भजनाचे गजरात करण्यात येईल.

याच धार्मिक सोहळ्याच्या अनुषंगाने बुधवार दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कार्तिक मास मांडीचा वाढवा कार्यक्रम महाराजांच्या अरजाने आणि रमण्यासह भजनाचे गजरात पार पडणार आहे. यावेळी अवधूत भजनासह विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्व कार्यक्रमास कार्तिक मास अखंड भजन मांडी मध्ये सहभागी झालेल्या अवधूत भजन मंडळांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात येत आहे.या धार्मिक उत्सवाचा भाविकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. तसेच सर्वांनी तन-मन-धनाने सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन श्री विठोबा संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल, विश्वस्त वसंत शेंडे, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रविण कुकडकर, लक्ष्मण राठोड, विष्णू राठोड, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी तसेच समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
