सामान्य सभेत सर्वानुमते निवड; उपस्थित विश्वस्तांकडून अभिनंदनाचा वर्षाव
चांदूर रेल्वे /तालुका प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात कापुराची यात्रा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थानच्या रिक्त विश्वस्त पदासाठी विष्णू किसनराव राठोड,सावंगा (विठोबा) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थानच्या सभागृहात गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सामान्य सभेत त्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
संस्थानच्या रिक्त झालेल्या विश्वस्त पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली.उपस्थित ११ ही विश्वस्तांनी यावेळी सावंगा विठोबा येथील रहिवासी असलेले युवा विष्णू किसनराव राठोड यांची नवनियुक्त विश्वस्त म्हणून सर्वानुमते निवड केली. निवडीनंतर उपस्थित विश्वस्तांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.विष्णू राठोड हे संस्थानच्या विविध धार्मिक उपक्रमांमध्ये सातत्याने सहकार्य करीत असून, सेवाभावी वृत्तीने कृष्णाजी महाराजांच्या सेवेशी जोडलेले आहेत. त्यांच्या धार्मिक व सामाजिक सेवाभावाची दखल घेत विश्वस्त मंडळाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त करून सर्वानुमते विश्वस्तपदी निवड केली.या सामान्य सभेला संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल यांच्यासह विश्वस्त वसंत शेंडे, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रविण कुकडकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर आणि स्वप्निल चौधरी उपस्थित होते.
