रक्तदात्यांचा गौरव, नव्या व पदोन्नत अभियंत्यांचे स्वागत तर सेवानिवृत्त अभियंत्यांचा सत्कार
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत विविध विभागांतील अभियंत्यांच्या वतीने भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त १६६ वा अभियंता दिन जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी मा. खासदार मा. श्री बळवंत जि वानखडे यांनी सुद्धा सदिच्छा भेट दिली.. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी होते.
प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, कार्यकारी अभियंता (बांधकाम विभाग) नीला वंजारी, कार्यकारी अभियंता( ग्रामीण पाणीपुरवठा विभाग )स्नेहा धावडे, कार्यकारी अभियंता मृद व जलसंधारण विभाग सुनील जाधव, अधीक्षक अभियंता यशवंत लवटे, कार्यकारी अभियंता(प्र ग्रा स यो )श्रीकांत आवंदकर तसेच कार्यकारी अभियंता (जलसंधारण विभाग ) श्री प्रेम शिंदे, श्री नितीन झगडे सहकोषाध्यक्ष राज्य अभियंता संघटना, श्री अतुल दिघाडे प्रवक्ता राज्य अभियंता संघटना,श्री अतुल रामटेके सचिव,श्री नकुल शेंडे कार्याध्यक्ष, श्री धीरज गभने कोषाध्यक्ष उपस्थित होते.प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकातून अतुल रामटेके यांनी अभियंता दिनाचे महत्त्व व अभियंत्यांची विकास प्रक्रियेतील भूमिका याबाबत माहिती दिली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी अभियंत्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा देत विकासकामांमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देतानाच कामांना गती देऊन निर्धारित वेळेत गुणवत्तापूर्ण कामे पूर्ण करण्याचे आवाहन केले. जिल्ह्याच्या विकासामध्ये अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून, तांत्रिक कौशल्यासोबतच कामामध्ये जबाबदारी, पारदर्शकता आणि गुणवत्तेची जपणूक आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.अभियंता दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करून त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद सेवेत नव्याने रुजू झालेल्या व पदोन्नती झालेल्या अभियंत्यांचे स्वागत करण्यात आले, तर सेवानिवृत्त अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अभियंता क्षेत्रातील सेवाभाव, योगदान आणि अनुभवाचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात श्री. यादव तरटे यांचे ‘ऐकण्याची कला’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता मशीदकर यांनी केले, सर्व विभाग चे उपअभियंता, व से नी अभियंता सुद्धा उपस्थित होते…तर आभार अतुल रामटेके यांनी मानले. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील अभियंते व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
