
ओशो आश्रम भानखेड येथे गुरूपौर्णिमेनिमीत्य वृक्षारोपन सपन्न
तिवसा/ रामचंद्र मुंदाने
अमरावती येथील भानखेड रोड येथे नव्याने सुरू होत असलेल्या ओशो आश्रमामध्ये गुरूपौर्णिमेच्या पर्वावर “एक पेड गुरू के नाम” या संकल्पनेने वृक्षारोपण करण्यात आले.१०जुलै गुरूवारी गुरु पौर्णिमेच्या पावण पर्वावर अमरावती भानखेड रोड येथे नव्याने सुरू होत असलेल्या ओशो आश्रमामध्ये ओशो ध्यान केंद्र अमरावती यांच्या विद्यामाने “एक पेड गुरू के नाम” या संकल्पनेतुन १५० विविध जातींच्या झाडांचे वृक्षरोपन करण्यात येवुन त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.निसर्गाची झपाट्याने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे . औद्योगीककरणामुळे रस्त्यांचे जाळे पसरलेले असले तरी रस्त्यालगत वृक्षांचा वानवा आहे . तापमान व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे.या वृक्षरोपण कार्यक्रमाला स्वामी श्रीवास्तव,स्वामी ध्यानमोक्ष,स्वामी आनंद घरडे,अविनाशजी भडांगे,स्वामी देशमुख,संतोषजी गांधी,मनोजजी विंचुरकर, अभिषेक महल्ले तसेच बहूसंख्येने ओशो प्रेमी उपस्थित होते.
Keep Growing