संत्रा, मोसंबी ऊत्पादक शेतकर्यांकरीता कार्यशाळा संपन्न.
चांदुर बाजार/एजाज खान
कळमेश्वर. दिनांक. 17/08/2025 रोज रविवारला ठीक 11 वाजता नवअनंत फार्मर प्रोडूसर कंपनी लिमीटेड म्हसेपठार रोड मोहपा येथे स्पेन देशातील टॅन्गो या जातीच्या सत्राचे भरघोस ऊत्पादन व व्यवस्थापनाची महत्वपूर्ण माहिती व AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऊत्पन्न वाढीकरीता मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेला खालील मार्गदर्शक व मान्यवर ऊपस्थित होते. मा.श्री सुधिरजी दिवे. सदस्य अॅग्रोव्हिजन फाऊंडेशन, मा.श्री प्रशांत कुकडे सदस्य कार्यकारी समिती डाॅ.पी.डी.के.व्ही.संचालक महाऑरेंज, मा.श्री मनोजजी जवंजाळ संचालक महाऑरेंज, मा. श्री गौरव बिजवे अॅग्रोनाॅमिस्ट , मा.श्री पुष्पकजी खापरे शेतकरी प्रतिनीधी फळपीक विमा समिती अमरावती, मा.श्री बाबारावजी कोठे अध्यक्ष खरेदी विक्री संघ कळमेश्वर, मा. श्री बाबारावजी पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कळमेश्वर, मा.श्री कृष्णरावजी हळदे प्रगतशील शेतकरी मोहपा , मा.श्री वैभव घोंगे माजी सभापती पं.स.कळमेश्वर मा.श्री त्र्यंबकराव मानकर से.नि.मंडल अधिकारी इत्यादी मान्यवर व कार्यशाळेला कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी श्री राकेश मानकर अध्यक्ष नवअनंत फार्मर प्रोडूसर कंपनी लिमीटेड यांनी अथक परीश्रम घेतले. कार्यशाळेचे संचालन सौ. हर्षलता मानकर संचालिका नवअनंत फार्मर प्रोडूसर कंपनी लिमीटेड यांनी तर श्री आशुतोष तभाने यांनी आभार मानले.
