व्यापारी संकुलाचे प्रवेशद्वार बंद असल्याने त्यालगत वाढले अवैध धंदे
व्यापाऱ्यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन
नेर परसोपंत /वसीम मिर्झा
नेर नगर परिषदच्या व्यापारी संकुलास मुख्य प्रवेशद्वार नसल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ नसल्यामुळे तिथे अवैध धंद्यांना गती आली आहे. जसे की दारू विक्री मद्यपान मटका जुगार अशा अवैध व्यवसायाला गती प्राप्त झाली आहे.त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना व्यसनाधीनतेचे व जुगाराचे व्यसन मोठ्या प्रमाणामध्ये लागत आहे.एवढेच नव्हे तर तिथे दारूमुळे दोन लोकांचे जागीच मृत्यू देखील झाले आहे. त्याचबरोबर त्या संबंधामुळे सामान्य प्रतिष्ठित नागरिक महिला तथा तरून मुला मुली संकुलामध्ये खरेदी करण्यास येण्यासाठी टाळाटाळ करतात व त्यांच्या मनामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले आहे. अशा विविध कारणामुळे नगरपरिषद येथील व्यापारी संकुलाचे मुख्य प्रवेशद्वार खुले करून मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर मो.सादिक गणी, वैभव मेहर, विष्णू चिरडे, फिरोज खान इरफ़ान अकबानी यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षरी होत्या.
