नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय,अमरावती यांचे वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत”नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर”, येथील १९ वर्ष मुलींचा संघ जिल्हा स्तरावर विजयी झाला असून विभाग स्तरीय स्पर्धे करिता पात्र झाला.या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक- श्री. प्रदीप ठाकरे, उपमुख्याध्यापक- श्री.शशीकुमार देशमुख, पर्यवेक्षक श्री. राजेश देशमुख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी अभिनंदन केले. मुलींच्या संघात कु.वैष्णवी संतोष इंजेवार, कु.श्रावणी दिनेश पवार, कु.अवनी दिनेश पवार, कु.जान्हवी रविन्द्र पारिसे, कु.कस्तुरी प्रशांत देशमुख, कु.आरती गजानन जाधव, कु.राणी सतीश मूल, कु.पल्लवी संतोष वानखडे, कु. क्रितीका शरद घोंगे या खेळाडूंचा समावेश असून सर्वत्र कौतुक होत आहे.

online marijuana store shipping edibles tinctures and vapes