नविन प्रभाग रचना दोन सदस्य संख्या प्रमाणे १२ असून २४इतकी आहे
मोर्शी /संजय गारपवार
मोर्शी नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. नवीन प्रमुख आराखड्यानुसार दोन सदस्य प्रभाग संख्या १२ असून सदस्य संख्या 24 इतकी आहे. परंतु नवीन प्रभाग रचनेमुळे नगरसेवकासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना प्रारूप प्रभाग रचना अनेक इच्छुक उमेदवारासाठी चांगली तर काही जणांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.राज्याच्या इतिहासात प्रथमच सलग पाच वर्ष प्रशासक म्हणून नगरपालिकेचे दैनंदिन कामकाज मुख्याधिकारी यांनी पाहिले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नगरपालिकेमध्ये प्रशासक राज मोर्शीकर नागरिकांना बघायला मिळाले. अखेर पाच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने इच्छुक बाशिंग बांधलेल्या नगरसेवकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. आगामी मोर्शी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली आहे. गुगल अर्थ किंवा तत्सम संगणीकृत नकाशाच्या आधारे नवीन प्रभाग रचना करण्यात आली आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या नवीन प्रभाग रचनेमुळे मोर्शी शहरात नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांन मध्ये काहीसे नाराजीचे वातावरण प्रकर्षाने दिसून आले आहे. नगरपालिकेच्या १२ प्रभागांमधून प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून द्यायचे असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना ही प्रभाग रचना सोपी झालेच्या तर काहींना अडचण झाल्याचे माजी नगरसेवकाने लोकमहर्षीशी बोलून दाखविली आहे.
प्रभाग क्र 1
उत्तरेकडील नळा नदीच्या पुलापासून पूर्वेकडे नदीपात्राणे सर्वे क्र. ५० व पुढे पूर्वेकडे नळा नदी काठाने सर्वे रु. २४ व सर्वे क. १० जवळील नळा नदी पुलापर्यंत.
एकूण लोकसंख्या ३०१६
सर्वे क्र. १० जवळील नळा नदी पुलापासून दक्षिणे कडिल सरफराज बैग हफीज खा यांच्या घराच्या पूर्व कोपर-या पर्यंत व पुढे गल्लीने मस्जिद समोरून सरळ रस्त्याने अब्दुल गणी यांच्या घराला वळसा देवून शामरावजी पकडे यांच्या गोठ्या पर्यंत व तेथून पश्चिमे कडे गुणवंतराव चौधरी यांचे घरापर्यंत व पुढे घरासमोरील रस्ता ओलांडून दक्षिणे कडील रस्त्याने अमरावती वरुड रस्त्यावरील अब्दुल अजीज यांचे किराणा दुकानापर्यंत व पुढे अमरावती – वरुड मुख्य रस्त्याने दक्षिणे कडे मोहन दिगांबर मडचे यांचे घरापर्यंत,दक्षिण मोहन डिगांबरराव मडघे यांचे घरापासून उत्तरे कडे खोलवाट पुरा रस्त्याने निलेश केळकर यांच्या गोठा पर्यंत व पश्चिमेकडे सर्वे क.४१ ते न.प. हद्दीपर्यंत.पश्चिम सर्वे क्र. ४१ जवळील न.प. चे हद्दीपासून उत्तरेकडे सर्वे क्र. ४७ व पुढे सर्वे क्र. ४८ च्या उत्तरेकडे नळा नदीच्या पुलापर्यंत.
प्रभाग क्र 2
उत्तर सर्वे रू. ७ च्या वायव्य कोप-या जवळील नळा नदीवरील पुलापासून पूर्वे कडे नळानदीच्या पात्राने वरुड-मोर्शी मुख्य रस्त्याने नळा नदीवरील पुलापर्यंत.नळा नदीच्या पात्राने दक्षिणेकडे वरुड-मोर्शी मुख्य रस्त्यावरील पुलापासून नळा नदीच्या पात्राने दक्षिणेकडे सर्वे क्र. ९७ व ९६ च्या दक्षिण पूर्व कोप-या पर्यंत,सर्वे क. ९६ च्या दक्षिण पूर्व कोप-याने पश्चिमेकडे सर्वे क्र. ९७ ची दक्षिण सीमा व पुढे उत्तरेकडे सर्वे क्र. ९८ जवळील तारामाता मंदिराच्या उत्तरदिशेने सुलतानपुरा रस्त्यापर्यंत व पुढे सुलतानपुरा रस्त्याने दोस्ताना चौक पासून पश्चिमेकडे मधुकर लाड यांचे घराचे दक्षिण पश्चिम कोप-या पर्यंत व पुढे अरुंद रस्त्याने जैस्वाल यांचे वायव्य कोप-या पर्यंत व पुढे श्रावनजी मेंढे यांचे घराच्या ईशान्य कोप-या पासून उत्तरेकडे अमरावती-वरुड मुख्य रस्त्या पर्यंत व पुढे श्री. साखरवाडे यांचे घरापर्यंत व पुढे मुख्य रस्त्याने पश्चिमे कडे शिवाजी कन्या शाळेच्या नैऋत कोप-या पर्यंत,शिवाजी कन्या शाळेच्या नैऋत कोप-या पासून उत्तरे कडे रस्त्याने गोहाड यांच्या घरापर्यंत व पुढे तभाने यांचे घरा पर्यंत व पुढे पूर्वेकडे रस्त्याने महादेव पकडे यांचे गोठ्या पर्यंत व पुढे राजिक शेख रशीद यांचे घराला वळसा घालून सरळ उत्तरेकडे अरुंद रस्त्याने साहेब खा उमर खा यांचे घराचे उत्तर पश्चिम कोप-या पर्यंत व पुढे सर्वे क्र. ७ च्या वायव्य कोप-या जवळील नळा नदीवरील पुलापर्यंत.
प्रभाग क्र 3
वरुड-मोर्शी मुख्य रस्त्यावरील साबळे यांचे मोबाईल शॉपी पासून पूर्वे कडे मुख्य रस्त्याने उत्तरेकडे अमरावती-वरुड मुख्य रस्त्याने सोमेश्वर गुजर यांचे घराचे ईशान्य कोप-या पर्यंत,सोमेश्वर गुजर यांचे घराचे ईशान्य कोप-या पासून दक्षिणे कडे रस्त्याने सातपुते यांचे किराणा दुकान पर्यंत व पुढे पश्चिम कडे दिपक गुहुकार यांचे घराचे ईशान्य कोप-या पर्यंत व पुढे दक्षिणे कडे सरळ रस्त्याने श्री. लेकुरवाडे यांचे खुली जागेपर्यंत व पुढे पूर्वे कडे दोस्ताना चौकातील अजमिरे याचे घरापर्यंत व पुढे दक्षिणे कडे तारामाता मंदिर वायव्य कोप-या पर्यंत व पुढे नाल्याने नळानदी जवळील सर्वे क्र. १११ च्या उत्तर दिशेने संगमेश्वर मंदिरापर्यंत,नळा नदीजवळील संगमेश्वर मंदिरापासून पश्चिमेस दमयंती नदीचे उत्तर किना-याने प्रल्हादराव ढोले यांचे घरापर्यंत व पुढे मस्जिद च्या आग्रेय कोप-यापासून दमयंती नदी पात्राने गुलाम दस्तगीर यांचे घरापर्यंत.गुलाम दस्तगीर यांचे घरापासून उत्तरेस अरुंद रस्त्याने गुडधे यांचे घरापर्यंत व पुढे गल्लीने उत्तरेस रघुनाथ नगरकर यांचे घरापर्यंत व पुढे सरळ रस्त्याने ठाकरे यांचे घराच्या नैऋत कोप-या पर्यंत व पुढे अरुंद बोळीने उत्तरेकडे विलासराव तडस यांचे घराच्या वायव्य कोप-यापर्यंत व पुढे सरळ पूर्वेस प्रमोद भोजणे यांचे घरापर्यंत व पुढे रस्ता ओलांडून श्री. काळे यांचे घरापासून उत्तरे कडे वरुड रोड मुख्य रस्त्यावरील साबळे यांचे मोबाईल शॉपी पर्यंत.
प्रभाग क्र 4
वरुड-अमरावती मुख्य रस्त्यावरील सौदागर यांचे बंद कॉम्प्लेक्स पासून अमरावती-वरुड रस्त्याने उत्तरे कडे विलास गोरडे ते पुढे भास्कर नेरकर यांचे घराचे ईशान्य कोप-या पर्यंत.भास्कर नेरकर यांचे घराचे ईशान्य कोप-या पासून दक्षिणे कडे रस्त्याने श्री. धर्मधिकारी यांचे घराचे आग्रेय कोप-या पर्यंत व पुढे पश्चिमेकडे रस्त्याने सावता चौक मधील प्रल्हादराव गाढवे गुरुजी यांचे घरापर्यंत व पुढे दक्षिणेकडे गल्लीने बबनराव मारोतराव ठाकरे यांचे घराचे दक्षिण पूर्व कोप-या पर्यंत व तेथून पूर्वेस बोळीने श्री. रामदास गहुकार यांचे घराला वळसा देवून श्री. डॉ. राम अग्रवाल यांचे घरापर्यंत व पुढे पश्चिमेकडे रस्त्याने गांधी चौकातील राउत यांचे घरापर्यंत व पुढे रस्ता ओलांडून अरुंद रस्त्याने डॉ. जोशी यांचे घरापर्यंत व पुढे दक्षिणे कडे धीमे यांचे दळण केंद्र व पुढे दक्षिणे कडे केचे यांचे घर व पुढे पूर्वे कडे अरुंद गल्लीने बाबूरावजी सावरकर यांचे घराचे उत्तर पूर्व कोप-या पर्यंत व पुढे दक्षिणेस रस्त्याने श्री. राजू महानकर यांचे घराचे पूर्व दक्षिण कोप-या पर्यंत व पुढे दमयंती नदीच्या पात्रापर्यंत.दमयंती नदीच्या पात्रापासून पश्चिमे कडे नदी पात्राने श्री. इस्माईल शाह यांचे घराचे दक्षिण पश्चिम कोप-या पर्यंत.ईस्माईल शाह यांच्या घराच्या दक्षिण पश्चिम कोप-यापासून उत्तरेस रस्त्याने गुलजार शाह यांच्या घराच्या उत्तर पश्चिम कोप-यापर्यंत व पुढे श्रीमती कमला गुल्हाने यांचे घरासमोरून उत्तरेस सरळ रस्त्याने श्री. राजगुरे यांचे घराचे वायव्य कोप-या पर्यंत व पुढे रस्ता ओलांडून नामदेवराव खाजोने यांचे घरापर्यंत व पुढे उत्तरेकडे अनंद रस्त्याने शेख आमद शेख ईमाम यांचे घराचे दक्षिण पश्चिम कोप-यापर्यंत व तेथुन पश्चिमेस वरुड-अमरावती रोड वरील श्री. सौदागर यांचे बंद कॉम्प्लेक्स पर्यंत.
प्रभाग क्र 5
नेयर बानो असद खा यांचे घराचे उत्तर कोप-या पासून दक्षिणे कडे अरुंद गल्लीने ते नासिम खा अलीयार खा यांचे घरापर्यंत व पुढे पूर्वेकडे नासीर खा राजे खा यांचे घराचे उत्तर पूर्व कोपऱ्या पर्यंत व पुढे दक्षिणे कडे रस्त्याने गुरुनानक मंदिरचे उत्तर पूर्व कोपऱ्या पर्यंत व पुढे दक्षिणेस न.प. कन्या शाळा व पुढे रस्ता ओलांडून दक्षिणेकडे सुलतान शाह यांचे घरा जवळील दमयंती नदी पुला पर्यंत व पुढे दमयंती नदी पात्राने आठवडी बाजारातील दमयंती नदी पुला पर्यंत आठवडी बाजारातील दमयंती नदी पुलापासून नदी पात्राने पश्चिमेकडे अमरावती-वरुड मुख्य रस्त्यावरील पुलापर्यंत अमरावती-वरुड महामार्ग पुलापासून उत्तरे कडे मुख्य रस्त्याने निपाणे व्यापारी संकुलाच्या पुढे अब्दुल रहेमान सौदागर यांचे नवीन दुकान पर्यंत
प्रभाग क्र 6
सर्वे क्र. ४१ च्या दक्षिणे कडील न.प. हद्दीपासून पूर्वे कडे सर्वे क्र. ३५ च्या उत्तर सीमेने जगन आप्पा यांच्या घरापर्यंत व पुढे अरुंद रस्त्याने खोलवाटपुरा रस्त्यावरील महादेव निबाळकर यांचे घराचे उत्तर पूर्व कोप-या पर्यंत. महादेवराव निबांळकर यांचा घराचा उत्तर पुर्व कोपऱ्या पासून खोलवाटपुरा रस्त्याने दक्षिणेकडे विजय कांबळे यांचे घर व पुढे दक्षिण कडे अमरावती-वरुड महामार्गावरील राजू खासदार यांचे घरा पर्यंत व पुढे दक्षिणेकडे अमरावती-वरुड महामार्गाने गौरक्षण मैदान ओझा महाराज व पुढे दक्षिणे कडे गणपती मंदिर समोरून जयस्तंभ चौक पर्यंत व पुढे अमरावती वरुड महामार्गावरील दमयंती नदी पुलापर्यंत.अमरावती वरुड महामार्गावरील दमयंती नदी पुलावरून पश्चिमेकडे नदी पात्राने सर्वे क्र. ५.३१ व ३२ जवळील हिंदू स्मशान भूमी समोरील चांदूर बाजार रोड पर्यंत.हिंदू स्मशान भूमी समोरील चांदूर बाजार रोड पासून उत्तरे कडे सर्वे क्र. ३४ च्या वायव्य कोपरा-यापर्यंत व पुढे पूर्वे कडे सर्वे क्र. ३५ च्या पश्चिम च्या सीमेपर्यंत व पुढे उत्तरे कडे सर्वे क्र. ३६ व सर्वे क्र. ४१ च्या दक्षिण सीमेजवळील न.प. हद्दीपर्यंत.
प्रभाग क्र 7
न.प. पश्चिम हद्दीवरील सर्वे नंबर १६० च्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासुन दमयंती नदी पर्यंत व पुढे पूर्वेला नदी पात्राने अमरावती – वरुड महामार्गावरील दमयंती नदी वरील पुला पर्यंत.अमरावती वरुड महामार्गावरील दमयंती नदी वरील पुला पासून महामार्गाने दक्षिणेकडे सिंभोरा चौकातील जनता पान सेंटरचा पश्चिम दक्षिण कोपरा पर्यंत व पुढे सिंभोरा रोडने पुर्वेकडे रामचंद्र कडु यांचे घराचे उत्तर पुर्व कोपऱ्या पर्यंत व पुढे दक्षिणेस न.प. रोडने वामनराव बुरंगे यांचे घराचे पश्चिम दक्षिण कोपरापर्यंत व पुढे सावरकर यांचे घराचा उत्तर पुर्व कोपरापर्यंत व पुढे दक्षिणेस न.प. रस्त्यांने हनुमान मंदिरांचा रोड ओलांडुन दक्षिणेस कृष्णराव कुबडे यांच्या घराच्या पुर्व दक्षिण कोपऱ्या पर्यंत.कृष्णराव कुबडे यांचे घराच्या पुर्व दक्षिण कोप-यापासुन पश्चिमेस सरळ रोडने ठाकरे यांचे घरा पर्यंत व पुढे उत्तरेस पुर्नवसन शाळेचे कंपाऊंडने सुभाष सुरजुसे यांचे घरापर्यंत व पुढे पुनवर्सन कॉलनी रोडने पश्चिमेला मडघे यांचे खाली प्लॉट पर्यंत व पुढे दक्षिणेस महामार्गाने मडचे मंगल कार्यालया च्या समोरील न.प. हद्दी पर्यंत.मडघे मंगल कार्यालया च्या समोरील न.प. हद्दी पासून न.प. सिमेने उत्तरेकडे सर्वे नंबर १७३ च्या दक्षिण कोप-या पर्यंत व पुढे न.प. सिमेने सर्वे नंबर १७३,१६२ च्या पश्चिम सिमेपर्यंत व पुढे सर्वे नंबर १६० च्या उत्तर पश्चिम कोप-या पर्यंत.
प्रभाग क्र.8
वरुड अमरावती महामार्गा वरील दमयंती नदी पुलापासुन नदी पात्राने पुर्वे कडे सर्वे क्रमांक २०७ च्या उत्तर सिमेपर्यंत व पुढे पुर्वेकडे पेठपुरा रोड पर्यंत व पुढे उत्तरे कडे शेख कॉम्पलेक्सच्या वायव्य कोप-या पर्यंत व पुढे पुर्वे कडे रस्त्याने अफसर अली मुशताक अली यांचे घराचे उत्तर पुर्व कोप-या पर्यंत.अफसर अली मुशताक अली यांचे घराचे उत्तर पुर्व कोप-या पासून दक्षिणे कडे शहा मोहम्मद खा यांचे घराच्या पुर्व दक्षिण कोप-या पर्यंत व पुढे पश्चिमे कडे पाण्याच्या टाकी कडे जाणाऱ्या रस्त्या पर्यंत व पुढे दक्षिणे कडे पशुवैद्यकीय कम्पाऊंड भिंतीने नागोराव वाहाने यांचे घरा पर्यंत व पुढे दक्षिणे कडे दुर्गवाडा रस्त्याने तस्लीम खा युसुफ खा यांचे घरा पर्यंत व पुढे पश्चिमे कडे सैय्यद अब्बास सैय्यद आमद यांचे घरापर्यंत व पुढे अजित शहा मसालेवाले यांचे घरा पर्यंत व पुढे रफिक खा अजीज खा यांचे घर पर्यंत व पुढे पश्चिमे कडे दुधडेअरी च्या कंपाऊंडला लागुन बानेकर दिवानजी यांचे घरा पर्यंत व पुढे पश्चिमे कडे न.प.शाळा क्र.८ च्या पश्चिम सिमेने अप्पर वर्धा वसाहतीच्या उत्तर सिमे पर्यंत व पुढे पश्चिमे कडे अप्पर वर्धा वसाहतीच्या उत्तर सिमेने पश्चिम सिमे पर्यंत व पुढे अप्पर वर्धा वसाहतीच्या : दक्षिण सिमेने हनुमान मंदीर पर्यंत व पुढे हनुमान मंदीराला वळसा देऊन मागील रस्त्याने अप्पर वर्धा सिमेंट गोडाऊंच्या रस्त्या पर्यंत व पुढे पुर्वेकडे रस्त्याने बोरवार यांचे घरा पर्यंत व दक्षिणेकडे चौधरी यांचे घरा पर्यंत.चौधरी यांचे घरापासुन समर्थ कॉलनी रोडने पश्चिमे कडे शरद विधळे वेल्डींग वर्क शॉप व पुढे पश्चिमे कडे एम.एस.ई.बि. पॉवर हाऊसच्या दक्षिणे कडील कम्पाऊंडने पश्चिमेकडे अमरावती वरुड महामार्गापर्यंत.वरुड अमरावती रोडवरील एम.एस.ई.वि.च्या कम्पाऊंड पासुन उत्तरे कडे तहसिल कार्यालय व पुढे उत्तरेकडे अग्रवाल पेट्रोल पंप जवळील वरुड अमरावती रोडवरील दमयंती नदी पुला पर्यंत
प्रभाग क्र -9
दमयंती नदीचे पात्र लगतचे सर्वे नंवर २२४ च्या वायव्य कोप-यापासुन नदीपात्राने पुर्वेकडे श्री. साबळे यांच्या घरापर्यंत तिथुन रस्ता ओलांडुन पुर्वेकडे सर्वे नंबर ११३ चे उत्तर पुर्व कोप-यापर्यंत.शेत सर्वे नंबर ११३ चे उत्तर पुर्व कोप-यापासुन शेत सर्वे नंबर ११५ चे पुर्व दक्षिण कोप-यापर्यंत व पुढे दक्षिणेकडे सर्वे नं. ११७ व २०३ चे पश्चिम धु-याने शेतः सर्वे नं. २०३ चे पुर्व दक्षिण कोप-यापर्यंत.शेत सर्वे नं. २०३ चे पुर्व दक्षिण कोप-यापासुन पश्चिमेकडे सर्वे नंबर २०४ चे धु-याने हिम्मतराव लसणकर यांच्या घराचे पुर्व दक्षिण कोप-या पर्यंत व पुढे रस्त्यांने अशोक मांडवे यांच्या घरापर्यंत व पुढे सार्वजनिक झेन्डा पर्यंत व पुढे उत्तरेस आत्माराम वाडीभस्मे यांच्या घरापर्यंत व पुढे मोहम्मद खाँ ठेकेदार यांच्या गोठ्यापर्यंत व पुढे सरळ रस्त्यांने पश्चिम दिशेने अताउल्ला खाँ यांची चक्की पर्यंत व पुढे जैस्वाल देशी दारुचे दुकानापर्यंत व पुढे सरळ रस्त्याने दक्षिणेकडे सर्वे क्र. २०७ च्या ईशान्य कोपऱ्यापर्यंत व पुढे सर्वे क्र. २०७ च्या वायव्य कोपऱ्या पर्यंत.सर्वे क्रमांक २०७ च्या वायव्य कोप-या पासुन दमयंती नदी पात्राने उत्तरे कडे दमयंती नदीचे पात्रा लगतचे सर्वे क्रमांक २२४ पर्यंत.
प्रभाग क्र 10
साहेब खा मास्तर यांच्या दुकानाचे उत्तर पश्चिम कोप-यापासुन पुर्वेस मोहम्मदखा ठेकेदार यांच्या गोठ्याचे उत्तर पश्चीम कोप-या पर्यंत तेथुन पुढे बोळीने रोड ओलांडुन प्रल्हाद कठाळे यांच्या घराचे उत्तर पश्चीम कोप-या पर्यंत.प्रल्हाद कठाळे यांच्या घराचे उत्तर पश्चीम कोप-या पासून बारकाजी शामरावजी सहारे यांच्या घराचे उत्तर पश्चिम कोप-यापर्यंत व पुढे दक्षिणेस श्रीमती रत्नाबाई ईडपाची यांच्या घराचे पुर्व दक्षिण कोप-यापर्यंत व पुढे सर्वे क्र.२०८ च्या दक्षिण सिमे पर्यंत व पुढे दक्षिणेकडे न.प.च्या जलशुध्दीकरण केंद्राच्या मागील बाजुने दुर्गवाडा रस्त्यावरील जलशुध्दीकरण केंद्राच्या दक्षिण संरक्षण भिंतीपर्यंत.दुर्गवाडा रस्त्यावरील जलशुध्दीकरण केंद्राच्या दक्षिण संरक्षण भिंती पासुन ऊत्तरेकडे नंदलाल साहु यांचे घरा पर्यंत व पुढे पश्चिमे कडे अरुंद रस्त्यांने मस्जीदच्या दक्षिण पश्चीम कोप-या पर्यंत व पुढे उत्तरेकडे न.प.च्या खुल्या जागे समोरील रस्त्या पर्यंत व पुढे पश्चिमेकडे सरळ रस्त्याने विठ्ठलराव खल्लारकर यांचे घरापर्यंत व पुढे दक्षिणेकडे सरळरस्त्याने
प्रभाग क्रमांक 11
वरुड अमरावती महामार्गावरील बस स्थानकाचे वायव्य कोपऱ्यापासून पूर्वेकडे सरळ रस्त्याने डॉ. नरेंद्र गावंडे यांच्या घरापर्यंत व पुढे. उत्तरेकडे मुलींच्या वस्तीगृहाच्या उत्तर सीमेने ईशान्य कोपऱ्यापर्यंत व पुढे पूर्वेकडे समर्थ कॉलनी रोडने गजानन महाराज मंदिर ते अशोक सोनवणे यांचे घरापर्यंत व पुढे उत्तरेकडे सरळ रोडने संदीप डहाके यांचे घरापर्यंत व पुढे उत्तरेकडे रवी ढोले यांचे दुकान व पुढे पूर्वेकडे सरळ रस्त्याने नगरपरिषद खुली जागा व पुढे दक्षिणेकडे मस्जीद मागील अरुंद बोळीने पूर्वेकडे दुर्गवाड रोड वरील खलील उद्दीन काजी यांचे घराचे उत्तर पूर्व कोपऱ्या पर्यंत दुर्गवाडा रोडवरील खलील उद्दीन काजी यांचे घराचे उत्तर पूर्व कोपऱ्या पासून दुर्गवाडा रोडने दक्षिणेकडे वन पर्यटन फॉरेस्ट गार्डनच्या आग्नेय कोपऱ्या पर्यंत वन विभागाच्या फॉरेस्ट गार्डनच्या आग्नेय कोपऱ्याापासून पश्चिमेकडे सर्वे क्रमांक ३ पर्यंत व पुढे दक्षिणेकडे सर्वे क्रमांक २ च्या उत्तर पूर्व कोपऱ्या पर्यंत व पुढे पश्चिमेकडे सर्वे क्रमांक ३ च्या दक्षिण पश्चिम कोपऱ्या पर्यंत व पुढे पश्चिमेकडे सर्वे क्रमांक ४ च्या पूर्व कोपऱ्या पर्यंत व पुढे पश्चिमेकडे भरत साबळे यांचे घरापर्यंत व पश्चिमेस सरळ रोडने पोहरकर यांचे घरापर्यंत व पुढे दक्षिणेकडे सरळ रोडने शिभोरा रोडवर ठाकरे यांचे दळण केंद्रापर्यंत व पुढे पश्चिमेकडे शिभोरा चौकातील सौदागर यांचे पान सेंटर पर्यंत शिभोंरा चौकातील पप्पू सौदागर यांचे पान सेंटर पासुन उत्तरेकडे वरुड अमरावती रोडने बस स्थानकांच्या वायव्य कोपऱ्या पर्यंत.
प्रभाग क्र १२
वरुड अमरावती महामार्गावरील परशुराम मंगल कार्यालयाच्या वायव्य कोपऱ्या पासून नितीन ठाकरे यांच्या घरापर्यंत व पुढे दक्षिणेकडे मुरली विंचूरकर यांचे घरापर्यंत व पुढे पूर्वेस सरळ रोडने विलास फरकाडे यांचे घरापर्यंत व पुढे उत्तरेकडे सरळ रस्त्याने नगर परिषदच्या खुल्या जागेतील वायव्य कोपऱ्यातील हनुमान मंदिरापर्यंत व पुढे उत्तरेकडे सरळ रस्त्याने विलास बुलबुले सर ते जगताप सर ते शिभोंरा रस्त्यावरील पतंजली स्टोअर पर्यंत व पुढे शिभोरा रस्त्याने दक्षिणेकडे दूरदर्शन जवळील श्री जयस्वाल यांच्या घराच्या नैऋत्य कोपऱ्या पर्यंत व पुढे उत्तरेकडे सरळ रस्त्याने हनुमान मंदिराच्या वायव्य कोपऱ्यापर्यंत व पुढे सरळ रस्त्याने पूर्वेकडे मारोतराव धामंदे यांच्या घरापर्यंत व पुढे रामभाऊ तायडे यांच्या घरापासून ते न.प. हद्दीपर्यंत.न.प.हद्दीपासून सर्वे क्रमांक ४ व पुढे दक्षिणेकडे सर्वे क्रमांक ९८ चे पूर्व धूऱ्याने शिभोरा रोड पर्यंत शिभोंरा रोड ओलांडून सर्वे क्रमांक ९८,९६,१७ व १६ च्या दक्षिण सीमेने वरुड अमरावती महामार्ग पर्यंत.वरुड अमरावती महामार्गावरील सर्वे क्रमांक १६ च्या नैऋत्य कोपऱ्या पासून उत्तरेकडे सरळ रस्त्याने परशुराम मंगल कार्यालयाच्या वायव्य कोपऱ्या पर्यंतची सीमा निश्चित करण्यात आली आहे.
