मलाबार ज्वेलर्सवतीने विजेत्यांना बक्षीस
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
श्रावण महिन्याच्या औचित्य साधून धनश्री सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान अमरावती आयोजित श्रावण सोहळा यशस्वी संपन्न झाला. या कार्यक्रमात डान्स स्पर्धा, फॅशन शो, स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते महिलांसाठी आयोजित या कार्यक्रमात शेकडो महिलांनी सहभाग घेतला डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवगौरी मंगळागौरी ग्रुप, द्वितीय क्रमांक नृत्यरंग तर फॅशन शो स्पर्धेत प्रथम क्रमांक पूर्वा मांगे, द्वितीय क्रमांक ऐश्वर्या मडगे व तृतीय वैशाली वानखडे लहान मुलीमध्ये प्रथम क्रमांक अवनी तायडे, द्वितीय क्रमांक मुद्रा पांडे, तृतीय परि कच्छवे यांना देण्यात आले धनश्री प्रतिष्ठानच्या श्रावण सोहळ्याचे आयोजन मलाबार गोल्ड अँड डायमंड ज्वेलर्स राजकमल चौक येथे रविवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी दू.१ ते ४ वेळेत करण्यात आले होते

या कार्यक्रमाला मलाबार ज्वेलर्सचे व्यवस्थापक जोशी तर कार्यक्रमाचे अध्यक्षपदी धनश्री प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष मंजू ठाकरे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. शोभना देशमुख, वुमन्स चैनल च्या संपादिका प्रीती साहू, ॲड. छाया मिश्रा, संकल्प सखीच्या संचालिका पुनम गोमासे, परीक्षक म्हणून लीना गावनेर यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनश्री प्रतिष्ठानच्या आरती बोंदरकर, कुंदा पुसदकर, सुचित्रा लहाने, पल्लवी बावस्कर, पूजा रडके कविता कछवे, स्वाती काळे, अबोली वानखडे, अपर्णा सदार, ऐश्वर्या मडघे, इत्यादी महिलांनी परिश्रम घेतले.
