
मंजुळ संगीत क्लास मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न
तिवसा / रामचंद्र मुंदाने
मंजुळ संगीत क्लास राठी नगर अमरावती च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी 10 जुलै गुरुवारी राठी नगर येथील मंजूळ संगीत क्लासच्या विद्यार्थ्यांनी गुरु पूजनाचा कार्यक्रम खूपच आनंदात उत्साहात व आगळ्यावेगळ्या पद्धतीने पार पाडला गुरु पूजनाच्या कार्यक्रमासाठी आदरणीय संतोषजी गांधी तसेच मंजूळ संगीत क्लासचे संचालक गुरुवर्य मनोजजी विंचुरकर सर हे प्रामुख्याने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन मंजुळ संगीत क्लास ची विद्यार्थिनी प्रिया चांदुरकर यांनी केले.यावेळी मंजूळ संगीत क्लासचे विद्यार्थी श्रीनिश अग्रवाल , भार्गवी चांदुरकर , तीर्था बोबडे, सानवी झोपाटे , अनुष्का राजुरकर ,दुर्गा राठोड, वैष्णवी देशपांडे, विद्या सूर्यकर , ज्योती पवार , कमल खडसे ,उज्वला बोबडे , प्रतीक गारपवार , श्रेयश टाले , स्वाती हेडाऊ ,सुनिता दंदे , युक्ती हेडाऊ ,उदयन हेडाऊ, ओजस्वी वानखडे ,दिवाकरजी वगारे , विजयकुमारजी रोडगे , झापे साहेब , लंगडे साहेब आदींनी मंजूळ संगीत क्लास विषयी आणि गुरु विषयी आपले मनोगत व्यक्त केले . व गीत गायनाने गुरुपूजन कार्यक्रमाची शोभा वाढविली . संतोषजी गांधी यांनी गुरु विषयी आपले मनोगत व्यक्त करतांना आपल्या जीवनाला घडवण्यात नीतिमत्तेच्या मार्गावर मार्गदर्शन करण्यात गुरूंचा मोलाचा वाटा असल्याचे सांगीतले . मनोज विंचुरकर सरांनी गुरु विषयी महत्व विशद करताना गुरु पौर्णिमा ही गुरुचा दिवस नसून शिष्यांचा दिवस आहे .गुरु शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे .विज्ञान जी ज्ञान आणि आत्मज्ञानाच्या प्रवासात मार्गदर्शन आदर आणि विश्वासावर आधारित आहे . जिथे गुरु शिष्याला ज्ञानाच्या मार्गावर चालवतो आणि शिष्य नम्रतेने व मोकळेपणाने शिकतो असे मत व्यक्त केले. त्यानंतर संगीत क्लासचे विद्यार्थी वेदांत मुंदाने व उन्नती निस्ताने यांनी “चला ना हमे नाम गुरु का चलाना”हे सामूहिक गीत सादर केले .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संतोषजी गांधी यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता मंजूळ संगीत क्लासच्या सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले .
What an incredible news writng Topic,Writing style , editing & motive everyting is perfect hatsoff man……..
Thank you sir