कृषी पूरक व्यवसायाला चालना; आधुनिक कुक्कुटपालन केंद्रास भेट देत प्रगतिशील शेतकऱ्यांशी संवाद
अंजनगाव बारी / (पवन इंगोले)
अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) विकास खरगे यांचा २२ मे २०२६ रोजी अमरावती जिल्ह्याचा महत्त्वपूर्ण दौरा होणार असून या दौऱ्यात विविध शासकीय कार्यालयांची पाहणी, विभागीय आढावा बैठकांसह ग्रामीण भागातील उपक्रमांना भेटींचा समावेश आहे.दौऱ्यात दि.२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता अंजनगाव बारीकडे प्रस्थानाने होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.२० ते ६.०० या वेळेत गाव म्हसला, अंजनगाव बारी रोड येथे स्थित आधुनिक कुक्कुटपालन केंद्रास भेट देण्यात येणार आहे.

भेटीदरम्यान केंद्राची कार्यप्रणाली, उत्पादन क्षमता आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रगतीबाबत माहिती घेण्यात येईल. प्रगतिशील शेतकरी रविंद्र मेटकर यांच्याशी चर्चा करून कृषीपूरक व्यवसायाच्या संधींबाबत सविस्तर पाहणी केली.या भेटीत “राज्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत कृषी पूरक व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे”, असे आवाहन अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांनी केल.दरम्यान, दौऱ्यासंदर्भात अप्पर मुख्य सचिव विकास खरगे, विभागीय आयुक्त नैना गुंडे आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सदिच्छा भेटही दिली. प्रशासनाकडून दौऱ्याची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून अधिकाऱ्यांकडून संबंधित विभागांना आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
अंजनगाव बारी परिसरातील शासकीय कामकाज, कुक्कुटपालन व कृषी पूरक उपक्रमांना या दौऱ्यामुळे चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
