लाडक्या बहिणींच्या तर्फे लाडक्या देवा भाऊला म्हणजेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठविल्या लाखाच्या संख्येने राख्या
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
रक्षाबंधनाच्या शुभ पर्वावर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री रविंद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने रक्षा पर्व हे अभियान राबविले. असून या अभियानाच्या माध्यमातून भाजपा अमरावती शहर जिल्हा व अमरावती जिल्हा ग्रामीण मोर्शी तथा अमरावती जिल्हा ग्रामीण मेळघाट तर्फे हे अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले,अमरावती जिल्ह्यातील सर्व बूथ स्तरापर्यंत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महिला घरोघरी पोहोचल्या आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद फडणवीस यांच्याकरिता राख्या गोळा केल्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील महिलांचे लाडके भाऊ आहेत.

आणि लाडक्या बहिणींनी त्यांना या राख्या पाठविलेल्या आहेत, फडणवीस यांना राखी पाठवत असताना त्यांच्यासोबत शुभ संदेश सुद्धा गोळ्या करण्यात आलेले आहेत, यामध्ये अनेक लाडक्या बहिणीने आपल्या मनातील भावना देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यांना भरभरून आशीर्वाद व प्रेम या माध्यमातून पाठविले आहे,उल्लेखनीय आहे की महिलांकरिता अनेक महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकार राबवित आहे, यामध्ये महिलांकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे एसटी बसेस मध्ये 50% सूट तिकीटमध्ये दिली जाते, सर्वात विशेष म्हणजे महाराष्ट्रातील लोकप्रिय योजना म्हणजे लाडकी बहीण योजना ज्या माध्यमातून अनेक लाडक्या बहिणींचे अडीअडचणी दूर व्हायला मदत होते आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरिता ही योजना अतिशय लाभदायी ठरलेली आहे, यामुळेच देवेंद्र फडणवीस यांचा देवा भाऊ असा उल्लेख केला जातो.भाजपा अमरावती शहर कार्यालयामध्ये आज या रक्षाबंधनापासून सुरू असलेल्या अभियानाचा समारोप करण्यात आला,यावेळी अमरावती शहर व अमरावती ग्रामीण मधून आलेल्या अनेक महिला यांनी बूथ स्तरापर्यंत जाऊन गोळा केलेला राख्या बॉक्समध्ये आणल्या आणि या अभियानाचे पालक म्हणून राज्यसभेचे खासदार डॉक्टर श्री अनिल बोंडे यांना राख्या सुपूर्द केल्या.अमरावती शहर जिल्ह्यातर्फे 38,700 हजाराच्या वर, तसेच अमरावती जिल्हा ग्रामीण मधून दीड लाखाच्या वर अशा एकूण दोन लाखाच्या वर राख्या यावेळी भाजपा महिला मोर्चा च्या महिलांनी डॉ अनिल बोंडे यांना सुपूर्त केल्या,अमरावती शहर जिल्ह्यामध्ये भाजपा शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्या नेतृत्वाखाली या अभियानाच्या संयोजक म्हणून महिला मोर्चाच्या माजी अध्यक्ष सौ. गंगा ताई खारकर यांनी काम पाहिले, 250 ते 300 महिलांनी सहभाग घेतला,

या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. श्री अनिल बोंडे, भाजपा अमरावती ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख,भाजपा प्रदेश सचिव श्री जयंत डेहनकर, भाजपा अमरावती शहर जिल्हा महामंत्री श्री बादल कुळकर्णी, ललित समंदुरकर, राधा कुरील, महिला मोर्चा शहराध्यक्ष सुद्धा ताई तिवारी, अनिता तिखिले, सौ प्रियंका मालठाणे, संगीता शिंदे,माजी उपमहापौर संध्या टिकले, लता देशमुख, उपस्थित होते,कार्यक्रमाचे संचालन सौ सुरेखा लुंगारे यांनी केले.या कार्यक्रमा मध्ये शहर उपाध्यक्ष मंगेश खोंडे, राजू राजदेव, राजू कुरील, सदू पुंशी,मंडळ अध्यक्ष प्रफुल्ल बोके, मनीष चौबे, छोटू वानखडे, भारती गुहे, सचिन नाईक, उमेश निलगिरे, संतोष कावरे, मेघा हिंगसापुरे, तृप्ती वाट, रेखा शेंद्रे, रिता मोकलकर, बरखा बोझे, ममता चौधरी, धनराज चक्रे, शान हिंगासपुरे राहुल जाधव अमरावती शहर तथा ग्रामीण च्या महिला तथा पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.
