मराठा सेवा संघ जिल्हा शाखा अमरावतीचे आयोजन.
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
राजश्री शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ अमरावती शाखेच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव सोहळा 26 जूनला सकाळी 11 वाजता स्मृतीशेष सचिन चौधरी सभागृह जिजाऊ प्रतिष्ठान मराठा नगरी रहाटगाव- अमरावती रोड अमरावती येथे सकाळी १० वाजता पासून आयोजित करण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणे मराठा कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये वर्ग 10 वी मध्ये 90 टक्के च्या वर, वर्ग बारावी 85 टक्के च्या वर, तर पदविका किंवा पदवी घेतलेले विशेष प्राविण्यप्राप्त तसेच विविध स्पर्धेतून निवड झालेल्या शासकीय सेवेतील गुणवंतांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
अमरावती, बडनेरा व भातकुली या शहरातील गुणवंतांनी हर्षाताई ढोक, मैथाली पाटील, मंजू ठाकरे,प्रतिभा रोडे मंजुषा पाथरे, सुरेखा धर्माळे, पूजा रडके यांच्याशी संपर्क साधावा. तसेच चिखलदरा- धारणी, अचलपूर- चांदूरबाजार, मोर्शी -वरूड, तिवसा-चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे- नांदगाव खंडेश्वर येथील मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपली नोंदणी २२ जून पर्यंत करून घ्यावी. आयोजन समितीचे मुख्य संयोजक संजय ठाकरे( 7083699489), विजय गाडगे (9420078378), हेमंत गावंडे मनीष पाटील मनोज सोळंके मयूर विघे अरविंद पागृत यांनी गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याला समाज बांधवांनी नोंदणी व उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले आहे.
