श्री देवदेवेश्वर संस्थांनचे महंत मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांचे प्रतिपादन
श्री आनंद दत्तधाम आश्रमात सुरू असलेल्या चुलबंद धोंडे जेवण अन्नदान कार्यक्रमास महंत बाबा मधुकर शास्त्री कवीश्वर यांची भेट
श्रीक्षेत्र माहूर/ तालुका प्रतिनिधी
माहूर गडावरील श्री आनंद दत्त धाम आश्रम येथे गेल्या 17 तारखेपासून सुरू झालेल्या धोंडे पुरुषोत्तम मास या निमित्ताने महा अन्नदान धोंडे जेवण सुरू असलेल्या कार्यक्रमास भगवान श्री दत्तप्रभू निद्रास्थान असलेल्या श्री देव देवेश्वर संस्थांनचे महंत मधुकर शास्त्री बाबा कवीश्वर यांनी भेट दिली. असता यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी साईनाथ महाराजांनी सुरू केलेले अन्नदान स्वच्छता अभियान सप्तसूत्री कार्यक्रमाची एक दिवस जग प्रेरणा घेईल असे प्रतिपादन केले यावेळी राष्ट्रसंत दभप साईनाथ महाराज वसमतकर यांचे सह मान्यवरांची उपस्थिती होती

मधुकर बाबा शास्त्री यांनी पुढे बोलताना सांगितले की श्री चक्रधर स्वामी महाराज यांनी नउशे वर्षांपूर्वी स्वच्छता अभियान 65 वर्ष राबविले होते त्यांचाच आदर्श घेऊन श्री संत गाडगेबाबा महाराज यांनी सुद्धा स्वच्छता अभियान राबवून देशाला नवी दिशा दिली होती त्यांचाच आदर्श घेऊन राष्ट्रसंत दभप साईनाथ महाराज वसमतकर यांनी सुरू केलेले स्वच्छता अभियान व्यसनमुक्ती अन्नदान महिला सक्षमीकरण वृक्षारोपण देशभक्ती शिक्षण जिवांचा उद्धार हे कार्य जगाला प्रेरणा देणारे आहेत आणि ज्या पद्धतीने साईनाथ महाराज हे कार्य करत आहेत त्यामुळे खरोखरच जीवांचा उद्धार होऊन जग यांच्या कार्याची नक्कीच प्रेरणा घेईल असे सांगून सर्व दत्त भक्तांच्या भक्तीने दत्तप्रभू प्रसन्न होऊन जगातील मानव जातीचे कल्याण करो अशी श्री दत्तप्रभू चरणी प्रार्थना केली

यावेळी महंत बाबा मधुकर शास्त्री कवीश्वर राष्ट्रसंत दभप साईनाथ महाराज वसमतकर यांचे सह भाऊ पाटील हाडसणीकर पत्रकार नंदकुमार जोशी सर विजय आमले नानासाहेब पांडे इलियास बावाणी. नवराष्ट्र माझा चे प्रतिनिधी. अंबादास मुकटे जवाहरलाल जयस्वाल एस एस पाटील यांचे सह मान्यवर भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
