नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचा कार्यकर्त्याच्या वतीने निर्धार करण्यात आला. तसेच निवडणुकीमध्ये येणाऱ्या बारीक बारीक अडचणी ची कार्यकर्त्याच्या वतीने कशाप्रकारे सोडवणूक करण्यात येणार असल्याचे मार्गदर्शन पक्षनेत्यांच्या वतीने करण्यात आले. त्यासोबतच याठिकाणी मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी निश्चित करण्याकरिता पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारी अर्ज मोठ्याप्रमात भरण्यात आली.त्यासोबतच याठिकाणी तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्याचा सत्कार देखील करण्यात आला.या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून आलेले वंचित बहुजन आघाडीचे पूर्व चे जिल्हा अध्यक्ष राहुलभाऊ मेश्राम, महासचिव सिद्धार्थजी भोजने सर, माथाडी कामगार चे जिल्हा अध्यक्ष विनयभाऊ बांबोळे, ॲड. सुनीलभाऊ गजभिये, प्रा. रविंद्र चवरे, इंजि. सुरेश दांडगे साहेब यांनी कार्यशाळेला मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष चंदूभाऊ गणवीर , युवक आघाडी तालुका अध्यक्ष रोशनभाऊ गाडेकर, माथाडी कामगार तालुका अध्यक्ष प्रणव मेश्राम, कपिलभाऊ नाईक, विशाल राऊत, जयकिरण इंगोले, कुंदन मेश्राम, सतिश शेंडे, धर्मराज भोसले, विजय डोंगरे, आर्थिक मेश्राम, अभय गणवीर, अवधूत बनसोड, यांच्यासह मोठ्याप्रमाणात कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दाखवत नवीन उत्साह निर्माण केला.
