सौ.प्रांजली राहुल गुल्हाने नगरसेविका नगर पंचायत नांदगाव खंडेश्वर यांची मागणी
नांदगाव खंडेश्वर ( तालुका प्रतिनिधी )
लोकप्रतिनिधींच्या मंत्री, खासदार, आमदार इत्यादी.शासकीय भेटीदरम्यान किंवा अंगणवाडी केंद्राच्या दौऱ्यावेळी अंगणवाडी सेविकांनी पाळायच्या प्रोटोकॉल आणि शिस्तीबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनचे ध्येय धोरणानुसार नियम आहे.पूर्वतयारी आणि केंद्र अंगणवाडी केंद्र आणि परिसर अत्यंत स्वच्छ ठेवावा.सर्व नोंदवह्या (Registers), लाभार्थ्यांची यादी आणि आहार वाटपाचे रेकॉर्ड अद्ययावत असावे. केंद्राचे नाव, कामकाजाची वेळ आणि शासनाच्या महत्त्वाच्या योजनांचे फलक दर्शनी भागात असावेत.भेटीच्या वेळी सेविका आणि मदतनीस यांनी शासनाने ठरवून दिलेल्या स्वच्छ आणि नीटनेटका गणवेशात असणे बंधनकारक आहे.ड्युटीवर असताना आपले ओळखपत्र (Identity Card) परिधान करावे. लोकप्रतिनिधींचे आगमन झाल्यावर त्यांचे नम्रपणे स्वागत करावे. माहिती सादरीकरणे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे स्पष्ट, मोजक्या शब्दात आणि पुराव्यासहित ( रेकॉर्डनुसार ) द्यावीत. चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती देऊ नये.संवाद साधताना आवाजात नम्रता ठेवावी आणि अनावश्यक वादावादी टाळावी.केंद्राच्या किंवा मानधनाच्या काही समस्या असतील, तर त्या तोंडी सांगण्यापेक्षा लेखी निवेदनाद्वारे विहित मार्गाने सादर कराव्यात. लोकप्रतिनिधींशी बोलताना आपल्या पदाची गरिमा आणि शासकीय नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.फोटोग्राफी आणि सोशल मीडिया अधिकृत कार्यक्रमाव्यतिरिक्त वैयक्तिक प्रसिद्धीसाठी लोकप्रतिनिधींसोबत विनाकारण फोटो काढणे किंवा ते लगेच सोशल मीडियावर पोस्ट करणे टाळावे. लोकप्रतिनिधींच्या भेटीदरम्यान अंगणवाडीतील मुलांच्या दैनंदिन उपक्रमात मोठा व्यत्यय येणार नाही आणि त्यांची सुरक्षितता धोक्यात येणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. असे निर्देश असतांना अंगणवाडी केंद्रांना विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीच्या पाहणीसाठी आणि इतर कारणांसाठी लोकप्रतिनिधी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच ईत्यादी लोकप्रतिनिधी भेट देत असतात. नगरसेवका नगरसेविका नगराध्यक्ष ईत्यादी भेट देतात या भेटींच्या वेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी लोकप्रतिनिधींशी सुसंवाद साधताना आणि त्यांना माहिती देताना विशिष्ट प्रोटोकॉल (शिष्टाचार) आणि शिस्त पाळणे आवश्यक आहे. यासंबंधी स्पष्ट आणि एकत्रित सूचना बाबींवर निर्गमित कराव्यात लोकप्रतिनिधींशी बोलताना आदरार्थी भाषेचा वापर करावा.अंगणवाडी केंद्रातील दैनंदिन कामकाज, शासनाच्या योजना पोषण आहार, लसीकरण आणि प्रगती अहवाल याबद्दल अचूक माहिती द्यावी. मागितलेली माहिती उपलब्ध नसल्यास, ती संबंधित पर्यवेक्षिका किंवा CDPO यांच्यामार्फत द्यावी. विनम्रता कोणत्याही परिस्थितीत लोकप्रतिनिधींशी वादविवाद टाळावा . भेटीच्या वेळी अंगणवाडी परिसर स्वच्छ आणि सुस्थितीत असावा. याबाबत सर्व अंगणवाडी सेविकांना व मदतनीस यांना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आपल्या स्तरावरून तातडीने आदेश परिपत्रक निर्गमित करण्यात यावे, अशी मागणी सौ.प्रांजली राहुल गुल्हाने नगरसेविका प्रभाग क्रमांक – १४ नगर पंचायच नांदगाव खंडेश्वर यांनी एका लेखी निवेदनाव्दारे प्रकल्प अधिकारी साहेब, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS), कार्यालय पंचायत समिती कार्यालय परिसर नांदगाव खंडेश्वर यांना केली आहे.
