नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ब्लड डोनर ग्रुप अमरावती विदर्भ महाराष्ट्र राज्य व विठ्ठल रूक्मिणी संस्थान शेलुगूंड यांच्या संयुक्त विद्यमानाने झालेल्या रक्तदान शिबीर हे रक्तदान शिबिर लावण्याचे कारण थॅलेसिमिया, सिकलसेल,अॅनेमीया अश्या गंभीर आचाराच्या लहान बाळाकरिता रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ब्लड डोनर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री योगेश सुरेश घोडे व उपाध्यक्ष श्री मनोज गावंडे यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर आयोजित केले या शिबिरामध्ये शेलूगुंड येथील तरुणांनी मोठया प्रमाणात रक्तदान केले.यावेळी सुमित भगत , नरेंद्र श्रुंगारे, पंकज वावगे, गजानन काळे, अंकुश वावरे, मंगेश भगत, विजय वावगे, सुनिल घाटे,पवन लाहे,धिरज वावगे,मोहन चोरे, आकाश घाटे,मनोज गावंडे,जयश,हाटे, नितिन राऊत, आणि नारी शक्ती महिला कु.ईश्वरी लाड,या सर्व रक्तदात्यांनी रक्तदान केले.या या रक्तदान शिबिराचे आयोजक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री योगेश सुरेश घोडे उपाध्यक्ष श्री मनोज गावंडे सचिव श्री सागर दामेकर श्रीकृष्ण रंगाचारे श्री सुमित भगत श्री मनीष काळमेघ श्री तुषार इंगळे श्री प्रवीण राऊत श्री विनोद कपिले श्री सागर ढेंगेकर श्री अकरम कुरेशी व जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथील रक्तपेठीने रक्त संकलन केले. डॉ श्री प्रफुल पेंदाम सर डॉ. श्री आशिष वाघमारे सर थॅलेसिमिया आजाराचे डॉ.मनोज सहारे सर जनसंपर्क अधिकारी श्री योगेश पांनझाडे सर श्री मिलिंद तायडे सर संगीता गायधने मॅडम श्री मंगेश उमप सर श्री प्रमोद ठाकरे सर या सर्वांचे सहकार्याने थॅलेसिमिया, सिकलसेल, अॅनेमीया अश्या गंभीर आचाराच्या लहान बाळाकरिता घेतलेले रक्तदान शिबिर चांगल्या रीतीने पार पडले.क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले ब्लड डोनर ग्रुप अमरावती विदर्भ महाराष्ट्र राज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष योगेश घोडे यांनी आपण सर्व रुग्णाच्या नातलगांनी जर ग्रुपच्या मार्फत रक्तदान शिबिर आयोजित करणे आपलं कर्तव्य आहे असे मत त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केले.
