तालुका अध्यक्षपदी नितेश कानबाले,सचिवपदी अंकुश निमनेकर यांची निवड.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांचे आदेशान्वये नांदगाव खंडेश्वर येथे एक महत्वपूर्ण बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार उत्तम ब्राह्मणवाडे हे होते.यामध्ये सन २०२६ – २७ यावर्षकरीता नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.तालुका अध्यक्षपदी नितेश कानबाले यांची तर उपाध्यक्षपदी सागर गावनेर,सचिवपदी अंकुश निम्नेकर,कार्याध्यक्षपदी गणेश माटोडे,संघटक म्हणून श्रीपाल सहारे यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली.तसेच सदस्यपदी पवन ठाकरे,अनिकेत शिरभाते,संदेश ढोके,योगेश राऊत, पवन इंगोले,मनोज जैन,सुरज सहारे,देविदास गाडेकर,सचिन राऊत,सतीश श्रुंगारे,गजेंद्र ढवळे, अरुण बनकर,प्रशांत झोपटे, अवधूत गाडेकर,गजानन भस्मे, विजय नाडे,आदी सदस्यांची निवड करण्यात आली.यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार उत्तम ब्राह्मणवाडे यांनी ग्रामीण भागातील पत्रकारितेची जबाबदारी,सामाजिक बांधिलकी, तसेच सत्य आणि निर्भीड पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले.आणि नव्या कार्यकारिणीकडून तालुक्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवणे,संघटन मजबूत करणे आणि ग्रामीण पत्रकारितेला नवी दिशा देण्याची अपेक्षा व्यक्त केली.यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.

