ग्राहकांच्या हक्कांसाठी नवा उत्साह
अचलपूर/ फिरोज खान
ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण आणि जनजागृतीसाठी काम करणाऱ्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत (ABGP) या स्वयंसेवी संस्थेच्या अचलपूर तालुका अध्यक्षपदी श्री. कमल केजडीवाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने झालेल्या बैठकीत संस्था कार्याच्या नव्या दिशा व उद्दिष्टांवर चर्चा करण्यात आली.सन १९७४ पासून ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणारी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही संस्था ग्राहकांना त्यांच्या अधिकारांबाबत आणि कर्तव्यांबाबत शिक्षण देणारी, तसेच शोषणाविरुद्ध आवाज उठवणारी अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. ग्राहकांना संघटित करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे.या नियुक्तीप्रसंगी विदर्भ प्रांतीय सचिव चारुदत्त चौधरी, जिल्हाध्यक्ष अशोक हांडे, महानगराध्यक्ष प्रदीप सगने, महानगर सचिव किरण गरीबे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली
अध्यक्ष : कमल केजडीवाल
, उपाध्यक्ष : डॉ. दीपक गुल्हाने, अरुण आकोटकर, निलेश सातपुते, दामोदरे,सचिव : अॅड. माधुरी भवाळकर,
सहसचिव : सतीश हंबर्डीकर, रविंद्रसिंह बघेले, अनिल लोकवाणी, मिश्रीलाल काकडे,
पर्यावरण प्रमुख : राजकुमार बरडिया, हुड, गुलाबराव धोटे,
सहकोषाध्यक्ष : पंकज गुप्ता, आयटी प्रमुख : आकाश भन्साली
प्रसिद्धी प्रमुख : राजेश शहा, संजय जैन, कोषाध्यक्ष : मंदार भारतीय.
महिला प्रतिनिधी : सौ. पल्लवी धर्माधिकारी, सौ. स्मिता देशपांडे, जयाताई सल्लाने,
सदस्य : प्रमोद कोरडे, डॉ. राम ठाकरे, डी. एन. मोरे, अॅड. दिवाकर शुक्ला, अर्जुन काळे, अशोक वस्तानी
प्रमुख मार्गदर्शक : संजीव देशपांडे, निमंत्रित सदस्य : श्याम क्षीरसागर
या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून ग्राहकांच्या हक्कांचे प्रभावी संरक्षण, जनजागृती आणि सशक्त ग्राहक चळवळ उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, संस्थेच्या कार्यात नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
