आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत करण्यात आली शास्त्रक्रिया
मोर्शी / संजय गारपवार
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती पर्वा निमित्ताने आज दिनांक 13/9/2025 रविवार रोजी 18सामान्य शस्त्रक्रिया ( अंडरुद्धी व पोटाचा हर्निया ,अपेनडिस्क,इतर ) ग्रामीण रुग्णालय वरूड येथे महात्मा फुले जन आरोग्य योजना व केंद्र शासनाच्या `आयुष्यमान भव योजना `अंतर्गत 18 रूग्णावर सामान्य शस्त्रक्रिया संपन्न झाल्या. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद पोतदार,डॉ.परिक्षीत रामपुरे, शल्यचिकित्सक डॉ . प्रविण बिजवे ,व डॉ. राहुल खऩना ,भुलतज्ञ डॉ. पकंज बिजवे, डॉ .जगदीश काळभोर, ,डॉ.हर्षाली पावडे, यांनी शिबिरकरिता परिश्रम घेतले. हे शिबिर , जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौदंळे, डॉ संदीप हेडाऊ, डॉ.गजानन पांडे,डॉ.अविनाश मरकट,डॉ.अकिंता मटाले,डॉ.काचंन भिसे,डॉ.सुरज आवारे ,नुतन मानेकर यांचे मार्गदर्शनाखाली पार पडले. तसेच ग्रामीण रुग्णालय वरूड येथील डॉ. हर्षल भूबंर,वरुड व मोर्शी चे वैद्यकीय समन्वयक डॉ. घनश्याम मानकर, कर्मचारी. सुनील वाडेकर,राखी कदम,प्राजंली खेरडे,सदिंप पवार, सागर झटाले , अक्षय सोनवणे, ललित इमले, कुणाल इमले, गवई ,शालु खंडारे महात्मा जोतिराव फुले जन व आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेतील राजेंद्र सावळकर,मंगेश कुरवाडे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी शिबिराच्या यशस्वीतेकरीता अथक परीश्रम घेतले.
