अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी येथील गार्गी वानखडे येणे नीट 2025 वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षा पास केली तिला एकुण 97.72 % गुण मिळाले असून तिने ह्या परीक्षेमध्ये 720 एकूण गुना पैकी 502 गुण मिळवले गार्गीचा एच.बी.टी. अँड आर एन कुपर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंधेरी मुंबई येथे एमबीबीएस करिता प्रवेश मिळाला आहे गार्गी चे वडील श्री संजीव उत्तमराव वानखडे हे आदिवासी माध्यमिक विद्यालय सलोना तालुका चिखलदरा येथे प्राचार्य असून आई सौ सुप्रिया संजीव वानखडे ह्या सा.द. सोनकुले विद्यालय वडगाव येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत तसेच भाऊ प्रशिक हा आयआयटी बिजनेस स्कूल वाकड पुणे येथे प्रथम वर्ष एमबीए करिता आहे तिच्या यशाबद्दल गार्गीचे सर्वत्र कौतुक होत असून तिची आजी श्रीमती मिनाबाई उत्तमराव वानखडे नातेवाईक सम्यक ग्रुप, सतीश वानखडे न प माजी उपाध्यक्ष यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
