मराठा सेवा संघाचे आयोजन
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
मराठा सेवा संघाच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने मराठा सेवा संघ अमरावती जिल्हा शाखा अमरावती व सर्व कक्षाच्या वतीने दि.७ सप्टेंबर २०२५ ला सकाळी १० वाजता मराठा – कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा स्मृतीशेष सचिन चौधरी सभागृह, जिजाऊ प्रतिष्ठाण मराठा नगरी,रहाटगांव नागपूर रोड अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता.

या सोहळयामध्ये वर्ग १० वी च्या ९० टक्के व त्यावरील, वर्ग १२ वी च्या ८५ टक्के व त्यावरील गुणप्राप्त विद्यार्थींचा गुणगौरव तसेच पदविका व पदवी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण, आचार्य( Ph.D) पदवी प्राप्त करणारे प्रज्ञावंत व विविध स्पर्धा परीक्षेतून शासकीय सेवेत निवड झालेले गुणवंताचा सन्मान उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेंद्र आडे जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ, उद्घाटक रवींद्र ठाकरे राज्य महिती आयुक्त अमरावती खंडपीठ यांच्या पत्नी जोशनाताई ठाकरे, तर प्रमुख पाहुणे , वर्षा भाकरे जिल्हा नियोजन अधिकारी, स्वाती गुडधे सहाय्यक निंबधक,, ज्ञानेश्वर घ्यार उपजिलाधिकारी,विशेष सत्कारमुर्ती दिलीप माणिकराव पाटील यांच्यासह

प्रमुख उपस्थितीत अरविंद गावंडे प्रदेश उपाध्यक्ष, अश्विन चौधरी अध्यक्ष राष्ट्रमाता जिजाऊ अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मनीष पाटील जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड हर्षाताई ढोक जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड ( पूर्व) अंजली ताई जवंजाळ जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड (पश्चिम)आदींची उपस्थीती होती .35 वर्ष संघटनेचे काम सातत्याने चालत राहणे ही की साधी सोपी गोष्ट नाही.मराठा सेवा संघाने अनेक अधिकारी,अभियंता वक्ता,लेखक,विविध क्षेत्रात काम करणारे युवक,युवती घडविले मराठा सेवा संघ ही कृतिशील माणसं घडवणारी संघटना आहे असे प्रतिपादन राज्य माहिती आयोग रवींद्र ठाकरे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केले.विशेष सत्कार मूर्ती दिलीप पाटील यांनीही फिटनेस संदर्भात उपस्थितीना मार्गदर्शन केले या गुणगौरव सोहळ्यात शेकडो समाज बांधवांचा सन्मानचिन्ह, मराठा सेवा संघाची पुस्तिका, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघाची जिल्हा शाखा च्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमात मराठा सेवा संघ अमरावती महानगर शाखेची कार्यकारणी विस्तारित करून पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष चे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले गुणवंत गुणगौरव कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोहर कडू तर सूत्रसंचालन जिल्हा सचिव संजय ठाकरे, सीमा देशमुख, तर आभार प्रदर्शन प्रीतम अरमळ यांनी केले तसेच कार्यक्रमाचा समारोप जितेंद्र सगणे,रुपाली सगणे यांच्या वतीने स्नेहभोज ने करण्यात आला गुणगौरव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष हेमंत गावंडे,जिल्हा उपाध्यक्ष राम बावस्कर, जिल्हा कार्यालय सचिव मनोज सोळंके,धनश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मंजू ठाकरे,पूजा रडके, विजय गाडगे, स्वप्निल दिवाण, अरविंद पागरुत, पंकज घाटे, रवी मोहोड, परेश धर्माळे, शिवाजी मकर, गजानन मामनकर, शुभम म हल्ले यांच्या सह मराठा सेवा संघातील सर्व 33 कक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
