अमरावती/जिल्हा प्रतिनीधी
अमरावती वडाळी मनपा शाळा क्रमांक 14 येथील सहाय्यक शिक्षिका चेतना माणिकराव बोंडे यांना मनपा अतिरिक्त आयुक्त माननीय शिल्पा नाईक यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आयुक्त श्रीमती सौम्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली 9 सप्टेंबर रोजी क्षितिज मंगल कार्यालय येथे शिक्षक दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती शिल्पा नाईक उपआयुक्त मेघना वासनकर, लेखापरीक्षक शामसुंदरजी देव, सिस्टीम मॅनेजर अमितजी डेंगरे , सहाय्यक आयुक्त नंदकिशोर चिखली , वैद्यकीय अधिकारी बोंद्रे सर , शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाशजी मेश्राम आदीसह उपस्थित होते .या कार्यक्रमात अमरावती महानगरपालिका सन 2025 – 26 मधील आदर्श शाळा पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शिक्षक पुरस्कार , मेजर ध्यानचंद क्रीडाशिक्षक पुरस्कार , उत्कृष्ट कार्य शिक्षक पुरस्कार ,अशा विविध पुरस्कारांनी अमरावती शहरातील विविध मनपा शाळेच्या शिक्षकांना गौरविण्यात आले .तसेच सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.या समारंभामध्ये वडाळी येथील मनपा शाळा क्रमांक 14 च्या सहाय्यक शिक्षिका चेतना माणिकरावजी बोंडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार अतिरिक्त आयुक्त मनपा अमरावती माननीय शिल्पा नाईक यांच्या हस्ते देण्यात येऊन त्यांना गौरविण्यात आले . चेतना बोंडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
