चार लाखांचा मुद्देमाल जप्त.स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
अमरावती ग्रामीण जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत शासन प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक करणारे दोन इसमांना रंगेहात पकडले. या कारवाईत सुमारे ४ लाख ४६ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपी अटकेत तर दोन आरोपी फरार आहेत.अटक केलेले आरोपीमध्ये,सै. अजरूददीन से. जमालउददीन (वय 39 वर्ष, रा. जमिल कॉलनी, अमरावती,शेख सलमान शेख युसुफ (वय 32 वर्ष, रा. अलीम नगर,अमरावती,तसेच या प्रकरणात दोन इसम फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.कारवाईचे तपशील पोलिस अधीक्षक अमरावती ग्रामीण श्री. विशाल आनंद (भापोसे) यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शेंदुरजनाघाट पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली.माहितीनुसार, पांढुर्णा वरून वरूडकडे जाणाऱ्या सिल्व्हर रंगाच्या हुंडाई एक्सेंट कारमध्ये शासन प्रतिबंधित गुटखा वाहतूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार स्थागुशा पथकाने पांढुर्णा-वरूड रोडवरील पिपलागड येथे नाकाबंदी करून संशयित कार अडवली. तपासणीअंती कारमधून मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला.जप्त मुद्देमाल शासन प्रतिबंधित गुटखा – किंमत अंदाजे ₹२,२६,८६०,हुंडाई एक्सेंट कार (क्र. MH-03 CH-1781) – किंमत अंदाजे ₹२,००,०००,दोन मोबाईल किंमत अंदाजे ₹२०,०००,एकूण जप्त मुद्देमाल ४,४६,८६० रुपये असून पुढील तपास सदर कारवाईनंतर दोन्ही आरोपींना शेंदुरजनाघाट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास शेंदुरजनाघाट पोलिस स्टेशनमार्फत सुरू आहे.कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचातीही कारवाई अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत (भापोसे) यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थागुशा प्रमुख पोनि किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पार पडली. पथकात पोउपनि सागर हटवार, पोलीस अंमलदार रविंद्र बावणे, बळवंत दाभणे, गजेन्द्र ठाकरे, पंकज फाटे तसेच चालक पोकॉं प्रशिक वानखडे यांनी कार्यवाहीत सहभाग नोंदवला.
