माहूर तालुका काँग्रेस कमिटीचे तहसीलदारांना निवेदन
माहूर / संजय घोगरे
काँग्रेसचे युवा नेते डॉ निरंजन केशवे यांनी झालेल्या महापुराचा प्रत्यक्ष दौरा केला असता शेतकऱ्यांचे अतोनात झालेले नुकसान पाहता माहूर काँग्रेसच्या वतीने डॉ.निरंजन केशवे यांच्या नेतृत्वामध्ये तहसीलदार माहुर यांना शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी करिता निवेदन देण्यात आले तसेच अंगणवाडी सेविकेच्या रेकॉर्डवरून नोंदी घेऊन जन्म दाखले द्या ही मागणी सुद्धा करण्यात आली.यावेळी. विमुक्त भटक्या जाती सेलचे जिल्हा अध्यक्ष मा.किसनदाम राठोड,तालुका अध्यक्ष बाळासाहेब देशमुख शिरूरकर,शहराध्यक्ष अजीम सय्यद,प्रवीण बरडे, सामाजिक कार्यकर्ते शे. रफिक भाई ,फय्याज फारुकी व काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
