नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने निसर्ग संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी या दुहेरी हेतूने नांदगाव खंडेश्वर येथील पाठक डेव्हलपर्स यांच्यावतीने पाठक नगर,गोविंद धाम येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नांदगाव खंडेश्वरच्या तहसीलदार सौ. अश्विनी जाधव तसेच पोलिस ठाण्याचे ठाणेदार श्रीराम लांबाडे उपस्थित होते.यावेळी मान्यवरांचे हस्ते लेआऊट परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमादरम्यान परिसरात हिरवळ वाढावी या उद्देशाने एकूण विविध प्रकारचे २५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

तसेच सामाजिक कार्याचा भाग म्हणून राजेश पाठक मित्रपरिवार यांचे कडून अपंग व्यक्ती मनोहर तानकर यांना तीन चाकी सायकल भेट देण्यात आली.या प्रसंगी शहरातील व्यवसायी हारून भाई लाखानी,रणजीत खंडारकर,अरुण लाहबर,सतीश पटेल,संजय जेवढे,अमोल ढवसे,गजानन डोक,इद्रिस भाई, इसामुद्दीन मोलवी साहेब,आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच यावेळी प्रतिष्ठित नागरिक भैय्या जाधव, ओंकार ठाकरे,प्रविण रावेकर,प्रमोद ठाकरे,मोरेश्वर दिवटे,गजानन मारोडकर,लवंगे सर,पायघन सर, अनंत इटनकर,संजय हाडके, पवन ठाकरे,नितीन ठवकर,अतुल पाटील,अक्षय कणसे,सुरेश ठाकरे,सुनील बिटले,गौरव देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
