
तहसीलदार याना दिले विविध मागण्यांचे निवेदन
चांदुर बाजार/ तालुका प्रतिनिधी
चांदुर बाजार तहसील कार्यालय येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे, तालुका प्रमुख शैलेश पांडे, युवा सेना तालुका प्रमुख रोशन जयसिंगपूरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, मे महिन्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे संत्रा व कांदा पिकाची नुकसान भरपाई मिळण्याकरीता, संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे रखडलेले मानधन मिळण्याकरीता, दिव्यांग व विधवा लोकांना अन्तोदय (३५ किलो धाण्याचे) राशन कार्ड देण्याकरीता, यशवंतराव चव्हाण व शबरी आवास योजना मंजूर लाभार्थ्यांना घरकुल चा टप्पा वितरीत करण्याकरीता, लाडक्या बहिणीला २१०० रुपये कुठलेही निकष न लावता सरसगट देण्याकरीता या मागणी करीता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदार राम शेळके यांनी प्रत्येक मुद्यावर चर्चा करून आठ दिवसात तालुक्यातील प्रत्येक मंडळात कॅम्प लावणार असल्याचे यावेळी सांगितले व ज्या लोकांचे अगठे व डोळे स्कॅन होत नाही अशा लोकांची कागदपत्रे जिल्हाधिकारी यांना पाठवन्यात येईल, बाकी प्रश्न मिटिंग लावून निकाली काढू या आश्वासना नंतर शिवसेनेचे आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे, उपजिल्हा प्रमुख आशिष वाटाने,महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख निर्मलाताई कौढन्यपुरे, शिवसेना तालुका प्रमुख शैलेश पांडे, युवा सेना तालुका प्रमुख रोशन जयसिंगपूरे, शिवसेना शहर प्रमुख शुभम सपाटे, अनिल सायंदे, पवन राऊत, दादाराव तायडे, ऋषिकेश रडके, विक्रम फुकट,मंगेश सापधरे, देवेंद्र औतकर, मनीष राठी, शंकरराव भेटाळू,कुशल भेटाळू,सुरेश काकडे, संजय ठाकरे, आशिब शाह, पप्पू बावणे व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, महिला, शेतकरी, अपंग व विधवा महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.