
एकलव्य क्रीडा अकादमी मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
स्थानिक पतंजली योग समिती व एकलव्य गुरुकुल स्कूल, एकलव्य क्रीडा अकादमी नांदगाव खंडेश्वरच्या मैदानावर 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन पार पडला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 21 जून रोजी गावामधून विविध धार्मिक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून योग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. योग रॅलीला एकलव्य क्रीडा अकादमीच्या मैदानावरून सुरुवात झाली मा. आमदार प्रताप दादा अडसड. यांच्या शुभहस्ते रॅलीला झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली गावातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते, कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रताप अडसड, मा. प्रसाद संकपाळ ( गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर ) ह. भ. प. उमेश महाराज जाधव, ह. भ. प. नारायण वैष्णव महाराज, मुन्ना जोशी राजेश पाठक ( भाजपा नेते ) रंजीत खंडाळकर ( शहराध्यक्ष भाजपा) निकेत ठाकरे ( तालुकाध्यक्ष भाजपा ) घनश्याम सारडा, दामू रुमणे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू, एकलव्य गुरुकुल स्कूलचे शिक्षक, शिक्षिका, रॅलीमध्ये सहभागी होते. नांदगाव शहरातून सायकल रॅली काढून ” करो योग रहो निरोग ” योग को अपनाना है रोग को भगना है” प्राणायामासाठी असे दिलेले नारे नांदगाव नगरीत आकर्षण ठरले. यावेळी 340 मुले, मुली, तरुण युवक, युवती, प्रौढ व्यक्ती, व महिला मंडळी उपस्थित होत्या 21 जून ला सकाळी 6:00 वाजता योग प्राणायाम व आरोग्याबद्दल माहिती घेण्यासाठी हजेरी लावली कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाचे पूजन करून प्राणायामाला सुरुवात झाली, योग प्राणायामाचे मार्गदर्शक सदानंद जाधव( शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त) यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता करिता महिला पतंजली योग समिती नांदगाव खंडेश्वर अनुप काकडे( योगशिक्षक ) विशाल ढवळे, उत्तम मुरादे, किशोर चकूले, पद्माकर पोपळी, दिनकर गोरले, गोपाल कडू, नितीन काळे, हरिश्चंद्र जोगे, यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास मारोटकर यांनी केले.
आमदार प्रताप अडसड यांनी आपल्या भाषणातून योगा म्हणजे मनुष्याच्या शारीरिक मानसिक व आध्यात्मिक विकासाची गुरुकिल्ली आहे, सर्वांनी नियमित योगसाधना करत या प्राचीन शास्त्राचे अगणित फायदे शोधले पाहिजे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगशास्त्राचे अविभाज्य स्थान मिळविल्यावरच समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होईल असे उद्गार आपल्या भाषणातून प्रताप अडसड यांनी केले व एकलव्य क्रीडा अकादमीचे योग दिन आयोजनाबाबत कौतुक केले.प्रसाद संकपाळ( गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर ) यांनी आपल्या मार्गदर्शनात योग व प्राणायामाने अनेक व्याधी सहज दूर करता येतात मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. ऑफिसमध्ये काम किंवा अभ्यास करताना फोकसच करता येत नाही त्याकरिता एकाग्रता वाढविण्यासाठी आपण प्रामुख्याने खास योग प्रकाराचा वापर करून एकाग्रता वाढवू शकतो असे सांगितले