
अखेर.. दिव्यांग शिक्षकांचे आमरण उपोषण सुटले.
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
पंचायत समिती भातकुली अंतर्गत जि.प.माध्यमिक शाळा उत्तमसरा येथे कार्यरत शिक्षक उमेश बसरे हे दिव्यांग असून यांच्यावर गेल्या २०२१-२२ पासून पदस्थापनेवरून सातत्याने पाठपुरावा करूनही प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालय अमरावती अन्याय करीत आहे. करीता आज दि. ९ जुन २०२५ पासून जिल्हा परीषद कार्यालयापूढे आमरण उपोषण करीत आहे.
२०२२ सत्रामध्ये गर्ल्स हायस्कुल अमरावती येथे विशेष बाब म्हणून एक कर्करोग ग्रस्त शिक्षिका आणि स्वत: उमेश बसरे दिव्यांग यांनी पदस्थापनेसाठी प्रस्ताव सादर केले परंतू प्राधान्यक्रम दिव्यांगाचा असूनही भेदभाव करून कार्यालयाने कर्करोग ग्रस्त शिक्षिकेला पदस्थापना देण्यात आली. ही बाब अत्यंत गंभीर दिसून येते. त्याविरोधात न्याय मागणीसाठी १२ सप्टेंबर २०२२ ला आमरण उपोषण केले त्यावेळी मु.का.अधिकारी अमरावती यांनी सदर शिक्षिका सेवानिवृत्त झाल्यानंतर पदस्थापना देऊ असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. सदर शिक्षिका डिसेंबर २०२५ ला सेवानिवृत्त झाल्यानंतर उमेश बसरे यांनी ५ डिसें २०२५ प्रस्ताव सादर केला परंतू तो प्रस्ताव फेटाळून त्यांना पदनावत साठी अर्ज सादर करायला लावला. करीता २७ फेब्रू २०२५ ला पुन्हा प्रस्ताव सादर केला. तरी अद्यापही कुठलीही कार्यवाही शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अमरावती कार्यालयाने केली नाही. गर्ल्स हायस्कूल अमरावती येथे इयत्ता ५ वी च्या संचमान्यतेनुसार २ पद रिक्त असून सुध्दा पदस्थापना देण्यात येईल व आपण दिलेल्या अर्ज प्रमाणे कारवाई करण्यात येईल अशे लेखी पत्र शिक्षण अधिकारी प्राथमिक अमरावती यांच्याकडून देण्यात आली आहे.
उपोषण सोडण्याकरिता विलास शिंदे अध्यक्ष शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना विद्युत विभाग मुंबई ३२. सुभाष चव्हाण अध्यक्ष आरोग्य विभाग यांच्या मोलाचे प्रयत्न मुळे उपोषण मागणी मागे घेण्यात आले आहे.
श्रीरामकृष्ण चिखलकर रंजीत तायडे दुर्वे सुनंदा कवाने रूपाली खोब्रागडे (विधी सल्लागार) संघटनेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.