
पिंपरी निपाणी येथे राज्यस्तरीय तपासणी कार्यक्रम संपन्न
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत ग्रामपंचायत पिंपरी येथे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा तपासणी करता राज्यस्तरीय समितीने दिनांक 10 जून 2025 रोजी भेट दिली सन 2022 23 या आर्थिक वर्षात स्वच्छता अभियान अंतर्गत करण्यात आलेल्या कामांची व लेख्यांची समितीकडून तपासणी करण्यात आली. ग्रामपंचायत पिंपरी निपाणी अंतर्गत घरोघरी देण्यात आलेले नळ जोडणी, प्रत्येक घरी वैयक्तिक स्वच्छतागृह, सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन, गावातील दैनंदिन कचरा संकलन, शुद्ध पिण्याचा पाण्याचा पुरवठा, पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, वैयक्तिक स्वच्छता, पाणी कर वसुली इत्यादी कामांची प्रत्यक्ष पाहणी करून तपासणी करण्यात आली.
राज्यस्तरीय समितीमध्ये अनिल धस अव्वर सचिव पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई दुर्गेश सोनजे कक्ष अधिकारी आणि पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन मुंबई आशितोष पाटील सहायक कक्षा अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्या टीमने अभियान कालावधीतील कामांची तपासणी करून मूल्यांकन केले . पिंपरी निपाणी येथील ग्रामस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कामांची नोंद समितीने प्राधान्याने घेण्यात आली.यावेळी जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय खारकर गटविकास अधिकारी डॉ. स्नेहल शेलार, विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव, सचिव विक्रम पिसे, विशाल कीटे,रोहित तायडे,दत्ता गायकवाड, नितेश अंभोरे,ऋषिकेश बोंडे, महेश ठाकरे,सूर्यकांत बनकर,सरपंच योगिता रिठे, उपसपंच पुष्पा प्रघणे,ग्रामपंचायत सदस्य दीपिका रिठे,पुष्पा रिठे,सुजाता डोंगरे,प्रतीक रिठे,गणेश धामणे व विशाल रिठे,सचिन रिठे, पोलीस पाटील संदीप डोंगरे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष शम्मी पठाण, प्रशांत पवार सर, तलाठी सुभाष थोरात, आरोग्य सेवक सुनील तेलंगे,अंगणवाडी सेविका तेजस्विनी वानखेडे, गटप्रवर्तिका मनीषा कडू, आशा स्वयंसेविका धामणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.