
सुजल दहावी मध्ये तर रूतुजा बारावी मध्ये मेरीट
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या वर्ग दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत शहापूर येथील राजेंद्र सहारे यांचे सुपुत्र सुजल राजेंद्र सहारे व उमेश सहारे यांची सुपुत्री रूतुजा उमेश सहारे यांनी अनुक्रमे दहावी व बारावीच्या परीक्षेत ९० टक्के च्या वर गुण मिळवून आपल्या आईवडिलांप्रमाणेच गावाचे नाव प्रकाशमान केले आहे. ही दोघेही भावंडं नांदगाव खंडेश्वर येथील नांदगाव हायस्कूल चे विद्यार्थी आहेत. त्यांना मिळालेल्या या यशाचे श्रेय ते आपले आईवडील, शाळेतील गुरूजनवर्ग यांना देत असून सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याची माहिती पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी दिली आहे.